corona virus : आता घरांमध्येही मास्क घालावा लागणार :आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 04:15 PM2020-07-27T16:15:41+5:302020-07-27T16:16:52+5:30
कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आहे. याचाच अर्थ घरातल्या घरात एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान काढता येते.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आहे. याचाच अर्थ घरातल्या घरात एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान काढता येते.
या संसर्गाला आवर घालावयाचा झाल्यास घरातील एखादी व्यक्ती परगावाहून, परराज्यातून आलेली असल्यास किंवा कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेली असल्यास अशा व्यक्तीने त्यांच्या घरामध्ये वावरत असताना ज्या पद्धतीने त्या घराबाहेर वावरताना मास्कचा वापर करतात, त्याच पद्धतीने त्यांनी घरामध्ये मास्कचा वापर करावा.
घरातील इतर व्यक्तींनीही घरातल्या घरात वावरतानाही मास्कचा वापर करण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरून त्यांच्याच घरातील व्यक्तीकडून त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.