CoronaVirus : कर्नाटकातील बाधितांची संख्या झाली २५३३ : नव्याने आढळले ११५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:20 IST2020-05-28T18:19:07+5:302020-05-28T18:20:05+5:30
कनार्टक राज्यात गुरुवारी ११५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण २५०० चा टप्पा राज्याने गाठला आहे.मात्र बेळगावात एकही रुग्ण नसला तरी बागलकोट येथील ८ रुग्णामुळे बेळगावची संख्या १४७ इतकी झाली आहे.

CoronaVirus : कर्नाटकातील बाधितांची संख्या झाली २५३३ : नव्याने आढळले ११५ रुग्ण
बेळगाव : कनार्टक राज्यात गुरुवारी ११५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण २५०० चा टप्पा राज्याने गाठला आहे.मात्र बेळगावात एकही रुग्ण नसला तरी बागलकोट येथील ८ रुग्णामुळे बेळगावची संख्या १४७ इतकी झाली आहे.
कर्नाटक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवारी कनार्टक राज्यात ११५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण २५३३ चा टप्पा गाठला आहे.मात्र बेळगावात एकही रुग्ण नसला तरी बागलकोट येथील ८ रुग्णामुळे बेळगावची संख्या १४७ इतकी झाली आहे.
आत्तापर्यंत ८०९ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस १६३५ इतक्या आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या २८ जणांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.
नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या जिल्ह्यांमध्ये बेंगलोर शहर (७ रुग्ण), यादगिर (७), चिक्कमंगळूर (३), हासन (१३), उडपी (२७), विजयपुरा (२), चित्रदुर्ग (६), कलबुर्गी (३), मंगळूर (६) आणि रायचूर (१ रुग्ण), बागलकोट येथील (८) या जिल्ह्यांचा समावेश आहे.