corona virus : यशवंत कोविड हॉस्पिटलमध्ये महिन्यात दीडशे रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 02:03 PM2020-09-21T14:03:42+5:302020-09-21T14:09:25+5:30
कोडोली येथील यशवंत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात दीडशेहून अधिक रुग्ण कोरोना मुक्त झाले.
कोडोली : कोडोली येथील यशवंत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात दीडशेहून अधिक रुग्ण कोरोना मुक्त झाले. ऑक्सीजनची आवश्यकता असणारे वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून जादा १५ ऑक्सिजन बेड वाढविणेत आले. सध्या सेंटरमध्ये ४७ ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार असल्याचे डॉ. जयंत प्रदिप पाटील यांनी सांगितले.
पन्हाळा, शाहूवाडी सारख्या डोंगराळ तालुक्यातील कोरोना रुग्णांना ताबडतोब सेवा मिळावी या हेतूने ग्रामीण भागात यशवंत धर्मार्थ रुग्णालयामार्फत १३ ऑगस्ट रोजी अद्यावत असे शंभर बेडचे डेडीकेटेड कोवीड रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला होता.
सेंटर सुरू झाले पासून एका महिन्यात दीडशे रुग्ण कोरोनावर मात करत कोरोनामुक्त झाले असून येथे दररोज साधारण पणे पन्नास कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. येथील रुग्णांना सकस व पौष्टीक आहार देण्यात येत असतो.
सध्या येथे ऑक्सिजन बेड संख्या ३२ असून नवीन पंधरा ऑक्सिजन बेड वाढवत असल्याने येथे सत्तेचालीस रुग्णांना ऑक्सिजनची सोय उपलब्ध होईल असे डॉ. जयंत पाटील म्हणाले.
या हॉस्पिटलकरिता यशवंत आयुर्वेदिक महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ मिलिंद गोडबोले, डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. अभिजित इंगवले, डॉ. हर्षल साबळे, डॉ. अभिजित शिराळकर, डॉ. नरेंद्र पाटील, यशवंत नर्सिंग कॉलेजचे प्राचार्या ग्रेस गायकवाड यांच्यासह आयुर्वेदिक कॉलेजच्या पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी अविरत काम करीत आहेत. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे डॉ. जयंत प्रदिप पाटील यांनी सांगितले.