corona virus : सीपीआरमध्ये शनिवारपासून ऑक्सिजन पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:33 PM2020-08-19T14:33:34+5:302020-08-19T14:49:16+5:30

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युद्धपातळीवर निर्णय घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून २० हजार लिटरचा ऑक्सिजन टँक खरेदी केला असून, मंगळवारी सीपीआर रुग्णालयामध्ये हा टँक बसविण्यात आला. त्यातून शनिवारपासून दिवसाला ४५० रुग्णांना ऑक्सिजनची सोय होऊ शकेल.

corona virus: Oxygen supply in CPR from Saturday | corona virus : सीपीआरमध्ये शनिवारपासून ऑक्सिजन पुरवठा

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी चेन्नईहून आणलेला टँक बसविण्यात आला.

Next
ठळक मुद्देसीपीआरमध्ये शनिवारपासून ऑक्सिजन पुरवठा ८५० लिटर वायुरूप ऑक्सिजन मिळणार

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युद्धपातळीवर निर्णय घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून २० हजार लिटरचा ऑक्सिजन टँक खरेदी केला असून, मंगळवारी सीपीआर रुग्णालयामध्ये हा टँक बसविण्यात आला. त्यातून शनिवारपासून दिवसाला ४५० रुग्णांना ऑक्सिजनची सोय होऊ शकेल.

रुग्णालयाच्या परिसरात ३० फूट उंच, दोन मीटर व्यास असलेला हा लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्यात आला. यासोबतच ४०० क्युबिक मीटर प्रतितास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. हा टँक २० हजार लिटर क्षमतेचा असून यातील एक लिटर द्रवापासून ८५० लिटर वायुरूप ऑक्सिजन मिळणार आहे.

या टँकमधून ह्य सीपीआरह्णमध्ये १५ ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन बँकेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटांपर्यंत ऑक्सिजनची सुविधा देण्यात येणार आहे. शनिवार (दि. २२)पर्यंत या टँकमधून ऑक्सिजन पुरविण्याची सुविधा कार्यान्वित होईल, असे डॉ. उल्हास मिसाळ आणि बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे यांनी सांगितले.

 

Web Title: corona virus: Oxygen supply in CPR from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.