corona virus : दुसऱ्या लाटेची शक्यता, निष्काळजीपणा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:10 AM2020-11-19T11:10:31+5:302020-11-19T11:11:32+5:30
coronavirus, zp, kolhapurnews डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. परदेशांतील आणि दिल्लीतील स्थिती पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नागरिकांनी सॅनिटायझेशन, मास्क आणि सामाजिक अंतर यांबाबतची दक्षता घ्यावी. निष्काळजीपणा करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.
कोल्हापूर : डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. परदेशांतील आणि दिल्लीतील स्थिती पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नागरिकांनी सॅनिटायझेशन, मास्क आणि सामाजिक अंतर यांबाबतची दक्षता घ्यावी. निष्काळजीपणा करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.
दिवाळीनंतर मित्तल यांनी आरोग्य संस्थांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांनी पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतील काही दवाखान्यांना भेटी दिल्या; तर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सकाळी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे हेदेखील उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर मित्तल म्हणाले, पहिली लाट आली तेव्हा जिल्ह्यात कशी परिस्थिती झाली होती याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे; परंतु आता आपल्याकडे साडेचार हजार बेड तयार आहेत; सध्या नॉन-कोविडचे उपचारही सुरू करण्यात आले आहेत. चाचण्या आणि ट्रेसिंगची कामे सुरूच आहेत. औषधसाठा, पीपीई किट पुरेशी आहेत; तथापि नागरिकांनी यापुढील काळात अधिक काळजी घेण्याची गरज आहे.