corona virus : कोल्हापुरात शुक्रवारपासून जनता कर्फ्यु शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 04:20 PM2020-09-08T16:20:40+5:302020-09-08T16:27:21+5:30
कोल्हापूर शहरातील कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन ग्रामीण भागाप्रमाणेच कोल्हापूर शहरातही शुक्रवारपासून ते १८ तारखेपर्यंत जनता कर्फ्यु लागू होण्याची शक्यता आहे. त्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिकेत आज मंगळवारी महापौर निलोफर आजरेकर यांच्या पुढाकाराने बैठक होत आहे.
कोल्हापूर : शहरातील कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन ग्रामीण भागाप्रमाणेच कोल्हापूर शहरातही शुक्रवारपासून ते १८ तारखेपर्यंत जनता कर्फ्यु लागू होण्याची शक्यता आहे. त्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिकेत आज मंगळवारी महापौर निलोफर आजरेकर यांच्या पुढाकाराने बैठक होत आहे.
कोरोनाचा कहर आटोक्यात आणण्यासाठी संसर्गची साखळी तोडण्याची गरज आहे.त्याचा विचार करून गडहिंग्लज, कागल तालुक्यासह सुमारे पंधराहून अधिक मोठ्या गावांनी जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. त्यामुळे शहरातही असा कर्फ्यु पुकारून व्यवहार बंद करा नाहीतर कोरोना आटोक्यात येणार नाही असा दबाव शहरातूनही वाढला आहे.म्हणून असा जनता कर्फ्यु लावण्याचा विचार पुढे आला आहे.
आज बैठक घेऊन निर्णय घेतल्यास शहरवासीयांना दोन दिवसांचा अवधी मिळू शकतो. त्यामुळे शुक्रवार ते शुक्रवार असा आठ दिवसांचा हा कर्फ्यु असू शकतो. कोल्हापुरात आतापर्यंत ९३०० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून सोमवारी एका दिवसांत १३६ नवे रुग्ण सापडले आहेत..कोल्हापुरातील तब्बल २३८ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे..
लॉकडाऊन कडक केल्यास गोरगरीब जनता, व्यापारी यांचे नुकसान होते म्हणून जिल्हा प्रशासन लॉकडाऊन कडक करण्यास तयार नाही त्यामुळे त्यावर आता जनतेनेच उत्तर शोधले आहे..