corona virus : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा अंगरक्षक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 04:46 PM2020-08-11T16:46:59+5:302020-08-11T16:48:27+5:30
कोरोनाचा कहर वाढत असतानाच जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांचे स्राव घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.
कोल्हापूर : कोरोनाचा कहर वाढत असतानाच जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांचे स्राव घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.
कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी आरोग्य प्रशासनासोबत पोलीस प्रशासन जीवाची बाजी लावून काम करत आहे. बंदोबस्त बजावताना नकळत कोरोनाग्रस्त नागरिकांशी पोलिसांचा संपर्क येऊ लागला आहे. त्यामुळे अनेक पोलीस व अधिकाऱ्यानाही कोरोनाची लागण होत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात सात पोलीस व अधिकाऱ्यसह एकूण ८० जणांणा लागण झाली आहे. त्यातील ४१ जण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनावरील चालक पॉझिटिव्ह आला असतानाच त्याच अधिकाऱ्याचा अंगरक्षकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
यामुळे आता त्या स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. सायंकाळी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण १० जणांचे स्राव घेऊन चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.