corona virus :सातव्या टप्प्यातील सर्वेक्षणास कोल्हापुरात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 07:57 PM2020-09-09T19:57:30+5:302020-09-09T19:59:31+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने केल्या जात असलेल्या सर्वेक्षणाच्या सातव्या टप्प्यास बुधवारपासून सुरुवात झाली. या टप्प्यातील रुईकर कॉलनी येथील सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी भेट दिली.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने केल्या जात असलेल्या सर्वेक्षणाच्या सातव्या टप्प्यास बुधवारपासून सुरुवात झाली. या टप्प्यातील रुईकर कॉलनी येथील सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी भेट दिली.
यावेळी देसाई यांनी नागरिकांशी संवाद साधला व महापालिकेच्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या कामात सहकार्य करावे. शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असलेने महापालिकेच्यावतीने युद्धपातळीवर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे स्वॅब घेण्यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्राच्या परिसरातील नागरिकांनी कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले असल्यास या आरोग्य केंद्रामध्ये स्वॅब दयावा, असे आवाहन केले आहे.
यावेळी उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रति अभिवंती, समन्वयक अधिकारी, सचिव, सिस्टर, आशासेविका आदी उपस्थित होते.