corona virus : गडहिंग्लज तालुक्यातील ३६ हॉटस्पॉट गावांचे सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:19 PM2020-09-10T19:19:04+5:302020-09-10T19:22:38+5:30

आरोग्य सेतू अ‍ॅपमधून मिळालेल्या माहितीनुसार गडहिंग्लज तालुक्यातील ३६ गावे कोविड हॉटस्पॉट घोषित झाली आहेत. या गावात कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी घर टू घर फेरसर्व्हेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी शरद मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

corona virus: Survey of 36 hotspot villages in Gadhinglaj taluka | corona virus : गडहिंग्लज तालुक्यातील ३६ हॉटस्पॉट गावांचे सर्व्हेक्षण

corona virus : गडहिंग्लज तालुक्यातील ३६ हॉटस्पॉट गावांचे सर्व्हेक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देगडहिंग्लज तालुक्यातील ३६ हॉटस्पॉट गावांचे सर्व्हेक्षणगटविकास अधिकारी शरद मगर यांची माहिती

गडहिंग्लज : आरोग्य सेतू अ‍ॅपमधून मिळालेल्या माहितीनुसार गडहिंग्लज तालुक्यातील ३६ गावे कोविड हॉटस्पॉट घोषित झाली आहेत. या गावात कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी घर टू घर फेरसर्व्हेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी शरद मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गडहिंग्लज तालुक्यात वेगाने फैलावणाऱ्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सहायक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांची उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या नावांची गावनिहाय याद्या तयार केल्या आहेत. त्यानुसार स्वॅब तपासणी घेण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी तालुका पातळीवर खास पथक नेमण्यात आले असून पॉझिटिव्ह रूग्णांच्या थेट आणि प्रथम संपर्कातील रूग्णांचा शोध घेवून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

हॉटस्पॉट गावांमधील सर्व्हेसाठी लागणारे थर्मल गन, पल्स आॅक्सिमीटर आदी साहित्य पुरविण्यात आले आहे. खाजगी डॉक्टर, औषध दुकानदार यांचे व्हॉटस अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीची जबाबदारी ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर सोपविण्यात आली. फेर सर्व्हेक्षण आणि तपासणीसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

फेर सर्व्हेक्षणाची यंत्रणा अशी

फेर सर्व्हेक्षणासाठी ४५० शिक्षक, २८५ अंगणवाडी सेविका, १९२ आशा स्वंयसेविका आणि २७२ मदतनीस काम करणार आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांना आणण्यासाठी २ रूग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

मास्क, सुरक्षित अंतर याबाबत जनजागृती करण्यासह अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप आणि बुस्टर डोस देण्याची व्यवस्था केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संबंधित गावे आणि पॉझिटिव्ह रूग्णांची घरे सोडीअम हायफोक्लोराईडने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, असेही मगर यांनी सांगितले.

ही आहेत संभाव्य हॉटस्पॉट गावे

दुंडगे, हनिमनाळ, हसूरचंपू, भडगाव, चन्नेकुप्पी, गिजवणे, वडरगे, महागाव, कळविकट्टी, करंबळी, नेसरी, इंचनाळ, हेब्बाळ जलद्याळ, मुंगूरवाडी, बुगडीकट्टी, बसर्गे, हलकर्णी, सांबरे, तेरणी, कडलगे, नांगनूर, नूल, येणेचवंडी, मुत्नाळ, हडलगे, हिटणी, कानडेवाडी, खणदाळ, मांगनूर तर्फ सावतवाडी, नौकूड, निलजी, कडगाव, हरळी बुद्रूक, औरनाळ, जरळी, लिंगनूर काानूल 

Web Title: corona virus: Survey of 36 hotspot villages in Gadhinglaj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.