corona virus : चौथ्या टप्प्यात ६० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:31 AM2020-06-22T11:31:09+5:302020-06-22T11:31:47+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण केले असून सध्या चौथा टप्पा सुरू आहे. यामध्ये ६० हजार ३०३ घरांचा सर्वेक्षण पूर्ण झाले असून यामध्ये दोन लाख ६१ हजार ४८९ नागरिकांची तपासणी केली. १८ मार्चपासून मोहीम सुरू आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण केले असून सध्या चौथा टप्पा सुरू आहे. यामध्ये ६० हजार ३०३ घरांचा सर्वेक्षण पूर्ण झाले असून यामध्ये दोन लाख ६१ हजार ४८९ नागरिकांची तपासणी केली. १८ मार्चपासून मोहीम सुरू आहे.
चौथ्या टप्प्यामध्ये शनिवारी दोन हजार ९४७ घरांतील १३ हजार ४२० नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये महाडिक माळ, टाकाळा, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, शिवाजी पार्क, वेताळ तालीम, चंद्रेश्वर गल्ली, बुवा चौक, राजघाट रोड, उभा मारुती चौक, बाजार गेट, शुक्रवार पेठ, तोरस्कर चौक, पंचगंगा तालीम, दुधाळी, रंकाळा स्टँड, फुलेवाडी, नाना पाटीलनगर, साने गुरुजी वसाहत, अंबाई टँक या ठिकाणी घरोघरी जाऊन ११ नागरी आरोग्य केंद्रांकडील कर्मचाऱ्यांमार्फत सर्व्हे करण्यात आला आहे.