corona virus : खासगी रुग्णालयातील दराबाबत पथकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:37 PM2020-10-08T12:37:37+5:302020-10-08T12:39:27+5:30
Muncipal Corporation, hospital, kolhapurnews, coronavirus कोल्हापूर महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयातील दाखल रुग्णांसाठी आकारली जाणारी दर तपासणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने बुधवारी महावीर कॉलेजजवळील डायमंड हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांना आकारलेल्या बिलांची शासन नियमांनुसार पडताळणी केली.
कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयातील दाखल रुग्णांसाठी आकारली जाणारी दर तपासणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने बुधवारी महावीर कॉलेजजवळील डायमंड हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांना आकारलेल्या बिलांची शासन नियमांनुसार पडताळणी केली.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह सहायक आयुक्त संदीप घार्गे, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, वरिष्ठ लेखापरीक्षक दीपक कुंभार, लेखाधिकारी मिलिंद पाटील, परवाना अधीक्षक राम काटकर यांच्या भरारी पथकाने डायमंड हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांना दिल्या जाणाऱ्या बिलांची शासन नियमांनुसार पडताळणी केली.
शासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला केली. तसेच रुग्णांना कच्चे बिल न देता पक्के बिलच देणे बंधनकारक आहे. रुग्णांना आकारणात येणाऱ्या दराचा फलक ठळकपणे लावावा; तसेच रुग्णालयात येणाऱ्या सर्वांना मास्क वापरल्याशिवाय प्रवेश देऊ नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई करावी, अशा सूचनाही पथकातील अधिकाऱ्यांनी केल्या.