corona virus : कोल्हापुरात कोरोना रुग्णांची हजाराकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 06:45 PM2020-07-06T18:45:24+5:302020-07-06T18:46:17+5:30
कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे असे वाटत असतानाच गेल्या चार दिवसांत बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासनाच्या छातीत धडकी भरली आहे. गेल्या चोवीस तासांत २५ रुग्ण नव्याने आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ९६६ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काहीशी शिथिल झालेली प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सक्रिय होऊन कोरोना विरुद्धच्या उपाययोजना कडक करण्याचा विचार करीत आहे.
कोल्हापूर : कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे असे वाटत असतानाच गेल्या चार दिवसांत बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासनाच्या छातीत धडकी भरली आहे. गेल्या चोवीस तासांत २५ रुग्ण नव्याने आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ९६६ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काहीशी शिथिल झालेली प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सक्रिय होऊन कोरोना विरुद्धच्या उपाययोजना कडक करण्याचा विचार करीत आहे.
ज्या गतीने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ते पाहता दोन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराचा टप्पा पूर्ण करेल असे दिसते. पहिल्या दोन अडीच महिन्यांत अतिशय चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे, तसेच नवीन रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पाहून काहीसा सुटकेचा नि:श्वास घेतला होता. परंतु, मागच्या चार दिवसांत नवीन रुग्णांची संख्या पाहता धडकी भरावी असे चित्र समोर येत आहे.
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाने सोमवारी सकाळी दहा दिवसांत जारी केलेल्या ह्यमेडिकल बुलेटीनह्णमध्ये नव्या २५ रुग्णांची भर पडल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९६६ वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी ७४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असून, आतापर्यंत १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णात शाहूवाडी तालुका (१८७ रुग्ण) आघाडीवर असून, सर्वांत कमी रुग्ण गगनबावडा (७) तालुक्यात आहेत. भुदरगड ७६, चंदगड १११, गडहिंग्लज ११०, हातगणंगले १८, कागल ५८, करवीर ३०, पन्हाळा २९, राधानगरी ७३, शिरोळ १२, इचलकरंजी ८६, कोल्हापूर महानगरपालिका ५९ व अन्य राज्य २० असे रुग्ण आहेत. इचलकरंजी, शिरोळ, गडहिंग्लज ही शहरे रेड झोनमध्ये आली आहेत.