corona virus : जिल्हा परिषदेतील कर्मचारी अस्वस्थ, पाझिटिव्ह वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 05:19 PM2020-09-08T17:19:12+5:302020-09-08T17:23:38+5:30

एकीकडे जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी पाझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत तरीही रूग्णालयात जागा मिळण्याची खात्री नसल्याने आणि उपस्थिती वाढतच चालल्यामुळे अखेर सर्व कर्मचारी संघटनांच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

corona virus: Zilla Parishad employees became restless, positive | corona virus : जिल्हा परिषदेतील कर्मचारी अस्वस्थ, पाझिटिव्ह वाढले

corona virus : जिल्हा परिषदेतील कर्मचारी अस्वस्थ, पाझिटिव्ह वाढले

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेतील कर्मचारी अस्वस्थ, पाझिटिव्ह वाढलेउपस्थिती घटवण्याची, बेड व्यवस्थेची मागणी

कोल्हापूर : एकीकडे जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी पाझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत तरीही रूग्णालयात जागा मिळण्याची खात्री नसल्याने आणि उपस्थिती वाढतच चालल्यामुळे अखेर सर्व कर्मचारी संघटनांच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

जिल्हयामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली पाहता यापुढच्या काळात विस्फोट होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनांच्यावतीने याआधीही आवश्यक उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आलेले होते तरी प्राप्त परिस्थितीची दखल घेऊन कर्मचाऱ्यांची संख्या १० टक्के करावी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या कार्यालयातील उपस्थिती नियंत्रित करावी, अभ्यागतांच्या कामाची निकड पाहून आणि खात्री करूनच त्यांना जिल्हा परिषदेत प्रवेश देण्यात यावा, अशा विविध मागण्या मित्तल यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर सचिन जाधव, अजित मगदूम, महावीर सोळांकुरे, अमोल घाटगे, दीपक साठे, फिरोजखान फरास, नीलेश म्हाळुंगेकर, सुधाकर कांबळे, मधुकर अंधारे, गस्ते यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.


कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

एकीकडे कोरोनाच्या काळात कर्मचारी काम करत असताना ते पॉझिटिव्ह आले किंवा त्यांच्या घरची मंडळी पॉझिटिव्ह आली तर त्यांच्यासाठी ऑक्सिजन बेड, व्हेन्टिलेटर मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी लेखी निवदेनाव्दारे मित्तल यांच्याकडे मांडली. यानंतर घोडावत विद्यापीठामध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी काही बेड राखीव ठेवण्यात येणार असल्याचे ग्वाही मित्तल यांनी दिल्याचे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.

Web Title: corona virus: Zilla Parishad employees became restless, positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.