हणमंतवाडी येथे कोरोना योद्धयांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:08+5:302021-08-23T04:27:08+5:30

कोपार्डे : हणमंतवाडी (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड योद्धे व पूरपरिस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीला पुढे आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ...

Corona warriors felicitated at Hanmantwadi | हणमंतवाडी येथे कोरोना योद्धयांचा सत्कार

हणमंतवाडी येथे कोरोना योद्धयांचा सत्कार

Next

कोपार्डे : हणमंतवाडी (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड योद्धे व पूरपरिस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीला पुढे आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

शिंगणापूर विद्यानिकेतन कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. सुहास भोई व कर्मचारी, हणमंतवाडी आरोग्य केंद्र परिचारिका गायकवाड व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका महावितरणचे कर्मचारी विवेक भोसले, तसेच पोलीस पाटील रवींद्र जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कामगार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी हणमंतवाडीचे सरपंच संग्राम भापकर, उपसरपंच तानाजी नरके, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, तसेच विष्णू जाधव, भरत भापकर, दिलीप खिल्लारी, सुरेश ननुद्रे, कृष्णात नरके, अमर पिंजरे, सुशांत खिल्लारी, विकास गायकवाड, दीपक भापकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो

हणमंतवाडी येथे कोविड योद्धयांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच संग्राम भापकर यांनी सत्कार केला.

Web Title: Corona warriors felicitated at Hanmantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.