दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे कार्य कौतुकास्पद : समरजित घाटगे : सीपीआरला दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 06:53 PM2021-04-19T18:53:07+5:302021-04-19T18:54:49+5:30

CoronaVirus Kolhapur: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे काम कौतुकास्पद असून, तेच दुसरी लाट परतून लावतील, असे उद्गार शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले.

Corona warriors' work admirable in second wave too: Samarjit Ghatge: Visit to CPR | दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे कार्य कौतुकास्पद : समरजित घाटगे : सीपीआरला दिली भेट

कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल धुमाळ व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मदतीबाबत सोमवारी चर्चा केली.

Next
ठळक मुद्देदुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे कार्य कौतुकास्पद : समरजित घाटगेसीपीआरला दिली भेट

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे काम कौतुकास्पद असून, तेच दुसरी लाट परतून लावतील, असे उद्गार शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले.

येथील सीपीआर रुग्णालयाला त्यांनी भेट दिली व जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची माहिती घेतली. आवश्यक सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हर्षला वेदक, बंटी सावंत, आदी उपस्थित होते.

शाहू ग्रुपमार्फत कोरोना प्रतिबंधक लसीचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू. शाहू साखर कारखान्यामार्फत चालविण्यात येत असलेल्या कोविड सेंटरवरही आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवू, असे घाटगे यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माळी म्हणाले, दुसऱ्या लाटेमध्ये ज्या ठिकाणी पूर्वी कमी संसर्ग होता, त्या ठिकाणी आता जास्त संसर्ग आहे व तरुण वर्गामध्ये तो मोठ्या प्रमाणात आहे. प्रतिबंधक लस घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कोल्हापूर जिल्हा लसीकरणामध्ये पाचव्या क्रमांकावर असून, ४६ टक्केपर्यंत लसीकरण पूर्ण झाले आहे. वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेऊन पूर्ण खबरदारी घेऊन पूर्वतयारी केली आहे.

मदतीसाठी शाहू अग्रेसर

भविष्यातील धोका ओळखून सहा महिन्यांपूर्वीच शाहू कारखान्यावर कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. परवाच कारखान्यामार्फत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. याशिवाय आरोग्य सेवेसाठी आणखी काही मदत लागल्यास सूचना करा, अशी विनंती वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधीलकीमध्ये ह्यशाहूह्ण नेहमीच अग्रेसर आहे, अशी प्रतिक्रिया देताच घाटगे यांनी नम्रपणे हात जोडून त्यांचे आभार मानले.

 

Web Title: Corona warriors' work admirable in second wave too: Samarjit Ghatge: Visit to CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.