बेळगावात कोरोनाचा कहर एका दिवसात 17 पोजिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 05:33 PM2020-04-16T17:33:15+5:302020-04-16T17:34:27+5:30

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना सारख्या विषाणूला आता भारतही अपवाद राहिला नाही. भारतामध्येही त्यांची संख्या दररोज वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव जिल्ह्यातही आता हा आकडा 36 वर जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत एका 80 वर्षीय वृद्धेचा ही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Corona wreck in Belgaum 17 positive in a day | बेळगावात कोरोनाचा कहर एका दिवसात 17 पोजिटिव्ह

बेळगावात कोरोनाचा कहर एका दिवसात 17 पोजिटिव्ह

Next
ठळक मुद्दे त्यामुळे यापुढे आरोग्य खात्याची चांगलीच धावपळ होणार असून नागरिकांनीही दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

बेळगाव   ---आज आतापर्यंत सुरक्षितच आहोत असे अनुभवणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. कारण बेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 36 वर जाऊन पोचला आहे. यामध्ये काही ग्रामीण भागातही याची लागण झाली असून अतिदक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. यामध्ये बेळगावचा एक रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे.

नुकतीच राज्य सरकारने दिलेल्या बुलेटीनमध्ये बेळगाव जिल्ह्यात एकूण 17 जणांना पुन्हा कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये हिरेबागेवाडी येथील 8 चिकोडी येथे एक, रायबाग येथे सात आणि बेळगाव(येळ्ळूर) येथे एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे यापुढे आरोग्य खात्याची चांगलीच धावपळ होणार असून नागरिकांनीही दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना सारख्या विषाणूला आता भारतही अपवाद राहिला नाही. भारतामध्येही त्यांची संख्या दररोज वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव जिल्ह्यातही आता हा आकडा 36 वर जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत एका 80 वर्षीय वृद्धेचा ही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच नुकतीच राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार कोरोनाची संख्या वाढू लागली आहे. यामुळे सरकारने दिलेल्या नियमावलीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

आज पोजिटिव्ह आलेल्या 17 पैकी तीन रुग्ण दिल्ली मरकज मधून आलेले त्याची पुन्हा चाचणी पोजिटिव्ह तर उर्वरित 13 जण दुसऱ्या पोजिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातून तर एक महाराष्ट्र मधील मिरज मधून असे प्रवास केलेले आहेत.काल पर्यंत एकूण 100 हुन अधिक जणांचे नमुन्यांची चाचणी अहवाल बाकी होती त्यापैकी हे रुग्ण पोजिटिव्ह आढळले आहेत.

बेळगाव जिल्ह्यात याआधी 19 जणांना कोरोनाची लागून झाली होती. आता गुरुवारी सतरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली असून आरोग्य खात्यानेही आता अतिदक्षता घेण्याकडे लक्ष दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव तालुक्यात एकूण पंधरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

बेळगाव जिल्हा रेड झोनमध्ये टाकण्यात आला आहे. तर बेळगावला सध्या हॉट स्पॉट मध्ये नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे तीन किलोमीटर कोणीही असेल त्यांना ये-जा करण्यास मज्जाव असणार आहे. ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यापुढे तरी ग्रामीण भागातील नागरिकांनीनियमांचे पालन रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Corona wreck in Belgaum 17 positive in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.