कोरोनामुक्तांनी प्रत्येकी एक तरी झाड लावावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:55+5:302021-06-06T04:17:55+5:30

कोल्हापूर : कोरोनामुक्त झालेल्यांनी निसर्गात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी किमान एका झाडाचे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन प्रशासक ...

Coronamuktas should plant at least one tree each | कोरोनामुक्तांनी प्रत्येकी एक तरी झाड लावावे

कोरोनामुक्तांनी प्रत्येकी एक तरी झाड लावावे

Next

कोल्हापूर : कोरोनामुक्त झालेल्यांनी निसर्गात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी किमान एका झाडाचे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेतर्फे महावीर उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी प्रशासक डॉ. बलकवडे आणि कोरोनामुक्त झालेले प्रसाद बिडंगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर डॉ. बलकवडे यांनी झाडांचे महत्त्व सांगितले. कोरोना झालेल्यांना ऑक्सिजनचे महत्त्व काय असते, ते कळाले आहे. यामुळे त्यांनी वृक्ष लावून जगवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिका व स्वरा फाउंडेशनतर्फे जयंती पंपिंग स्टेशन येथे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, लक्ष्मीपुरी स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक पोलीस निरीक्षक नेहा गिरी यांच्या हस्ते वड, पिंपळ, जारूळ, बदाम, कदंब, करंज, गुलमोहर, बकूळ ही झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अधिकारी तथा प्रभारी उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, नगरसचिव सुनील बिद्रे, सहा उद्यान अधीक्षक राम चव्हाण, स्वरा फाउंडेशन डायरेक्टर प्राजक्ता माजगावकर, प्रमोद माजगावकर, शाखा अभियंता आर. के. पाटील, अध्यक्ष सविता पाडलकर, उपाध्यक्ष अमृता वास्कर, जीवन आधार रेस्क्यूचे विनायक लांडगे आदी उपस्थित होते.

फोटो : ०५०६२०२१- कोल- महापालिका वृक्षारोपण

कोल्हापुरातील महावीर उद्यानात डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Coronamuktas should plant at least one tree each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.