कसबा सांगाव ठरतंय कोरोनाचा हाॅटस्पाॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:50+5:302021-04-30T04:28:50+5:30
कसबा सांगाव : कागल तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असणाऱ्या कसबा सांगाव येथे कोरोना लाटेच्या दुसऱ्या टप्प्यात आठच दिवसात कोरोना ...
कसबा सांगाव : कागल तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असणाऱ्या कसबा सांगाव येथे कोरोना लाटेच्या दुसऱ्या टप्प्यात आठच दिवसात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने हे गाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत, आशा स्वयंसेविका या कोरोनाची चेन ऑफ द ब्रेक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असले तरी नागरिकांनीही नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे. दरम्यान, येथे लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत ९,५०० इतक्या नागरिकांना लस दिली आहे. गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पाच दिवसांचा कडक लाॅकडाऊन करण्यात आला आहे. लोकसंख्या मोठी असल्याने दररोज चार ते पाच पाॅझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. कसबा सांगाव येथे ज्यांना सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. असे अनेक जण निवांत गावामधून फेरफटका मारत आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन रॅपिड अँटिजन टेस्ट व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ही आज ६१ वर पोहोचली आहे. त्यामधील चौघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.