महापुराबरोबरच कोरोनाचा जोरही ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:26 AM2021-07-28T04:26:21+5:302021-07-28T04:26:21+5:30

कोल्हापूर : गेले तीन महिने कोल्हापुरात धुडगूस घालणाऱ्या कोरोनाचा जोरही महापुराबरोबरच वेगाने ओसरू लागला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची ...

Corona's strength also waned with the flood | महापुराबरोबरच कोरोनाचा जोरही ओसरला

महापुराबरोबरच कोरोनाचा जोरही ओसरला

Next

कोल्हापूर : गेले तीन महिने कोल्हापुरात धुडगूस घालणाऱ्या कोरोनाचा जोरही महापुराबरोबरच वेगाने ओसरू लागला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या पाचशेच्या खाली आली आहे. मंगळवारी नवे ४६७ रुग्ण आढळले असून, मृत्यूही १५ पर्यंत खाली आले आहेत.

महापुरामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचाही परिणाम रुग्णसंख्येवर झाल्याचे दिसत आहे. चाचण्यांची संख्या अवघ्या २५ टक्क्यांवर आल्या आहेत. मंगळवारी पाच वाजता आलेल्या अहवालानुसार १५ पैकी एक मृत्यू बाहेरील जिल्ह्यातील आहेत. रुग्णसंख्येतही सर्वाधिक १८६ रुग्ण कोल्हापूर शहरात आढळले आहेत. शहरातील रुग्णसंख्याही दोन महिन्यांत पहिल्यांदाच दोनशेच्या आत आली आहे. मृत्यूमात्र अजूनही सर्वाधिक चार आहेत. हातकणंगलेतही चार मृत्यू आहेत.

आता पूर ओसरू लागेल तशी वाहतूक सुरू होऊन चाचण्यांची संख्याही वाढणार आहे. सध्या जिल्हाभर सुरू असलेली रॅपिड अँटिजन टेस्टही बंदच आहे. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यामुळे आता ज्यांना जास्तीचा त्रास सुरू झाल्यानंतर आणि दवाखान्यात भरती झाल्यानंतरच चाचण्या होत आहेत.

आजचे मृत्यू

कोल्हापूर शहर : ०४ कसबा बावडा, जवाहरनगर, कोल्हापूर, मंगळवारपेठ

कागल: ०१ सोनगे,

करवीर: ०२ उचगाव, सांगवडे,

हातकणंगले : ०४ हुपरी, इचलकरंजी, खोतवाडी, गावभाग हातकणंगले,

शाहूवाडी : ०१ चरण

गडहिंग्लज : ०१ भडगाव,

शिरोळ : ०१ शिरोळ,

इतर जिल्हा : ०१ हिवले (कणकवली)

Web Title: Corona's strength also waned with the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.