तळसंदेत कोरोना 'सुपर स्प्रेडर' तपासणी दिलासादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:57+5:302021-06-05T04:17:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथे दुकानदार व व्यावसायिक यांची अँटिजन तपासणी करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथे दुकानदार व व्यावसायिक यांची अँटिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीत ७५ पैकी फक्त १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.
आज शुक्रवारी तळसंदेत हातकणंगले पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदीप पाटील व गटविकास अधिकारी डाॅ. शबाना मोकाशी यांच्या उपस्थितीत अंबप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश गायकवाड यांच्या पथकाने अँटिजन तपासणी मोहीम राबवली. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णास प्राथमिक शाळेतील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात उपचारासाठी ठेवले. तळसंदेत आता ७ रुग्ण उपचाराखाली आहेत.
सरपंच अमरसिंह पाटील, उपसरपंच सावित्री चव्हाण, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल चव्हाण, तलाठी अविनाश कुंभार व ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते.
आशितोष पाटील, अमोल मोहिते, हर्षवर्धन चव्हाण, संजय चव्हाण, उदय शिंदे, राकेश चिमटे, सुशांत चिमटे, अनिकेत शिंदे, बाबासोा चव्हाण, योगेश चव्हाण, सचिन चव्हाण, प्रथमेश जाधव, सुरेश जाधव या तरुणांनी पॉझिटिव्ह रुग्णांची जेवण व औषधांची संपूर्ण सोय केली आहे.
फोटो ओळी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथे दुकानदार व व्यावसायिक यांची 'कोरोना सुपर स्प्रेडर' अँटिजन तपासणी प्रसंगी सभापती डॉ. प्रदीप पाटील व गटविकास अधिकारी डाॅ. शबाना मोकाशी, डॉ. शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते.