गारगोटी स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेह दहन करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:00+5:302021-05-21T04:25:00+5:30

गारगोटी : गारगोटी गावभागातील नदीवेस परिसरातील नागरिक हे स्मशानभूमी परिसरात राहत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित मृतदेहाचे दहन स्मशानभूमीत करू नये. ...

Coronated bodies should not be cremated in Pebble Cemetery | गारगोटी स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेह दहन करू नये

गारगोटी स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेह दहन करू नये

Next

गारगोटी :

गारगोटी गावभागातील नदीवेस परिसरातील नागरिक हे स्मशानभूमी परिसरात राहत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित मृतदेहाचे दहन स्मशानभूमीत करू नये. असे मृतदेहाचे रिकाम्या माळावर दहन करावे या मागणीचे निवेदन ग्रामस्थांतर्फे प्रांताधिकारी डॉ. खिलारी, तहसीलदार अश्विनी आडसुळ, सरपंच संदेश भोपळे यांना दिले आहे. या भागातील १०० नागरिकांनी सह्या करून प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार अश्विनी अडसूळ, सरपंच संदेश भोपळे यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनावर विक्रम आरडे, संदीप शिंदे, संतोष सोरटे, अनिल शिंदे, विनोद कुलकर्णी, सदाशिव सोरटे, बजरंग कांबळे, प्रसाद सावंत, रफिक मुल्लाणी, रफिक महालदार, सुलतान पठाण यांच्यासह १०० नागरिकांच्या सह्या आहेत.

२० गारगोटी निवेदन

फोटो ओळ

कोरोनाबाधित मृतदेह स्मशानभूमीत दहन करू नयेत या मागणीचे निवेदन गारगोटी ग्रामपंचायतमध्ये देताना गावभागातील कार्यकर्ते.

Web Title: Coronated bodies should not be cremated in Pebble Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.