करवीरमध्ये कोरोनाबाधितांची व मृत्यूची ‘लाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:48+5:302021-06-02T04:19:48+5:30

कोपार्डे : करवीर तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत होणारी वाढ व कोरानाबाधितांचा मृत्यू रोखण्यात प्रशासन व आरोग्य विभागाला अपयश येत ...

Coronation and death wave in Karveer | करवीरमध्ये कोरोनाबाधितांची व मृत्यूची ‘लाट’

करवीरमध्ये कोरोनाबाधितांची व मृत्यूची ‘लाट’

Next

कोपार्डे : करवीर तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत होणारी वाढ व कोरानाबाधितांचा मृत्यू रोखण्यात प्रशासन व आरोग्य विभागाला अपयश येत आहे. करवीरमध्ये कोरोनाबाधितांची व मृत्यूची ‘लाट’ निर्माण झाल्याचे सध्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग झालेली संख्या करवीर तालुक्यात आहे.

दुसऱ्या लाटेची चाहूल करवीर तालुक्याला एप्रिलमध्ये लागली मात्र बाधित व मृत्यू अत्यल्प प्रमाण होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र एका आठवड्यात ५० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. पण कडक लॉकडाऊनची जनतेकडून ‘ऐसी की तैसी’ अशी भूमिका घेतल्याने समूह संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

पहिल्या टप्यात शहरालगतची गावे हॉटस्पॉट झाली पण मेच्या पहिल्या आठवड्यापासून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होऊ लागला आहे. अगोदर १०० ते १५० कोरोना बाधितांचा आकडा गेल्या आठ दिवसांत ३०० ते ३५० वर पोहोचला आहे. दररोजचा बाधितांचा व मृतांची आकडेवारी पाहता कडक लॉकडाऊननंतरही करवीरमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे

करवीर तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात ८ हजार २९ लोकांना कोरोनाची बाधा झाली. यातून रिकव्हरी रेट चांगला असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात अपयश येत आहे. विशेषतः तरुणांचा मृत्यू वाढल्याने चिंताजनक परिस्थिती आहे. करवीर तालुक्यातील ३५ ते ४० गावे सध्या हॉटस्पॉट बनली आहे. बेड मिळत नसल्याने रुग्ण होम आयसोलेशन होत असल्याने पुन्हा धोका वाढत आहे

एप्रिल व मे महिन्यात कोरोनाबाधित व कोरोना रुग्णांचा मृत्यू याचा लेखाजोखा

एप्रिल मे कोरोनाबाधित -- १,०१८ ६,०९०

मृत्यू -- ५२ १९२ रिकव्हरी रेट -- ८५ टक्के ९० टक्के डेथ रेट -- १ टक्के ५ टक्के

Web Title: Coronation and death wave in Karveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.