CoronaVirus : मुंबईहुन आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा कट्टनभावीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 01:38 PM2020-06-06T13:38:01+5:302020-06-06T13:39:26+5:30
कट्टनभावी (ता.बेळगाव) गावातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच येथील एका ५० वर्षीय मुंबईतुन आलेल्या व्यक्तीचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.
बेळगाव : कट्टनभावी (ता.बेळगाव) गावातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच येथील मुंबईतुन आलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.
मुंबईहून परतलेल्या कट्टनभावी गावातील ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पद्धतीने गावातील बाधितांची संख्या वाढत असताना ७ दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन झालेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. प्रारंभी सात दिवसाचे इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन पूर्ण झाल्यानंतर या व्यक्तीला घरी जाऊ देण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता आज शनिवारी सकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे कट्टनभावी गावात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. या व्यक्तीचा अहवाल चाचणीसाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल येणे बाकी आहे. त्याचा मृत्यू कोरोनाने झाला असल्यास बेळगावातील कोरोनाचा हा दुसरा बळी ठरणार आहे यापूर्वी हिरेबागेवाडी येथील वृद्धेचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.