CoronaVirus : सक्तीने शैक्षणिक फी वसूली केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 03:51 PM2020-06-13T15:51:57+5:302020-06-13T15:56:34+5:30

लॉकडाऊनच्या या काळातील परिस्थिती पाहता पालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज असताना फी वसूली केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

CoronaVirus: Action taken against compulsory tuition fees | CoronaVirus : सक्तीने शैक्षणिक फी वसूली केल्यास कारवाई

CoronaVirus : सक्तीने शैक्षणिक फी वसूली केल्यास कारवाई

Next
ठळक मुद्देसक्तीने शैक्षणिक फी वसूली केल्यास कारवाईमाध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे संस्था आणि मुख्याध्यापकांना पत्र: पालकांना दिलासा

कोल्हापूर: लॉकडाऊनच्या या काळातील परिस्थिती पाहता पालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज असताना फी वसूली केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

२०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी पालकांकडून सक्तीने शैक्षणिक फी वसूली केल्यास संबंधित शैक्षणिक संस्था अध्यक्ष, सचिवासह मुख्याध्यापक यांना जबाबदार धरुन कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

शनिवारी लोहार यांनी संस्था अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांना पत्र काढून कारवाईची इशारा नोटीस लागू केली आहे. कोरोनाच्या या काळात आर्थिक संकट असताना शाळा व संस्थाकडून प्रचंड प्रमाणात डोनेशनची मागणी केली जात आहे.

याविरोधात शिवसेनेचे माजी आमदार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ऑल इंडीया स्टुडन्ट फेडरेशनतर्फे दोन दिवसापुर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले होते. याची दखल घेत शिक्षणाधिकारी लोहार यांनी ही कारवाईची नोटीस बजावली आहे.



 

Web Title: CoronaVirus: Action taken against compulsory tuition fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.