CoronaVirus : केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:09 PM2020-06-10T17:09:55+5:302020-06-10T17:11:37+5:30
राज्यातील सर्व केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी द्यावी, व्यावसायिकांना आर्थिक हातभार म्हणून शासनाने अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या भाग म्हणून बुधवारी कोल्हापूर शाखेतर्फे शहरासह जिल्हाभर नाभिक व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
कोल्हापूर : राज्यातील सर्व केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी द्यावी, व्यावसायिकांना आर्थिक हातभार म्हणून शासनाने अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या भाग म्हणून बुधवारी कोल्हापूर शाखेतर्फे शहरासह जिल्हाभर नाभिक व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊनमुळे नाभिक व्यवसाय बंद आहे. इतर सर्व व्यावसायिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या अटीवर सरकारने परवानगी दिली. मात्र, नाभिक व्यावसायिकांना त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या व्यवसायावर निर्र्भर असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाच्या अटी व शर्ती पाळून आम्ही व्यवसाय करू. त्याकरिता त्वरित परवानगी द्यावी, या मागणीसाठी शाहूपुरी पाचवी गल्ली येथे नाभिक व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी महामंडळाच्या कोल्हापूर शाखेचे शहराध्यक्ष विवेक सूर्यवंशी, संदीप शिंदे, गणेश राऊत, राहुल टिपुगडे, महामंडळाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा भाग्यश्री सूर्यवंशी, अनिल शिंदे, संतोष चव्हाण, आदी उपस्थित होते.