CoronaVirus :बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर, जिल्ह्यात तब्बल ३६ नवे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 06:45 PM2020-06-05T18:45:31+5:302020-06-05T18:46:37+5:30
बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ३६ नवीन कोरोनाचे रुग्ण वाढल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याने दिली आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अडीचशे पार झाला आहे.
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ३६ नवीन कोरोनाचे रुग्ण वाढल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याने दिली आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अडीचशे पार झाला आहे.
गेल्या चार दिवसांत बेळगाव जिल्ह्यात शंभर रुग्ण वाढले आहेत. मंगळवारी ५१, बुधवारी १३ आणि आज शुक्रवारी ३६ असे चार दिवसांत १00 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात नवे ३६ रुग्ण आढळले असताना कर्नाटक राज्यात देखील एका दिवसात ५१५ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याचा आकडा ४८३५ इतका झाला आहे. आता पर्यंत एका दिवसात राज्यात पाचशेहुन अधिक रुग्ण सापडण्याची ही पहिली वेळ आहे.
शुक्रवारी सापडलेले ३६ रुग्ण बेळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणचे आहेत याबाबत मात्र आरोग्य खात्याने दिलेली नाही, मात्र आरोग्य खात्याच्या सूत्रांनुसार ते यमकनमर्डी मतदारसंघातील असण्याची शक्यता आहे. या ३६ पैकी ३४ रुग्ण महाराष्ट्रातील तर दोघेजण हरियाणा येथील आहेत.