CoronaVirus : कोरोनाग्रस्तांची संख्या मंदावली; रुग्णसंख्या ६३०वर; एकूण २८२ जणांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:10 PM2020-06-03T17:10:12+5:302020-06-03T17:12:13+5:30
गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूच्या आजारावर मात करून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज झालेल्यांची संख्या २८२ झाली, ही दिलासादायक बाब आहे; तर रोजच्यापेक्षा कोरोनाग्रस्तांची संख्या पूर्णपणे मंदावली. सकाळपर्र्यत एकाही नव्या रुग्णांची भर पडली आहे; त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ६३० पर्यंत पोहोचली आहे.
कोल्हापूर : गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूच्या आजारावर मात करून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज झालेल्यांची संख्या २८२ झाली, ही दिलासादायक बाब आहे; तर रोजच्यापेक्षा कोरोनाग्रस्तांची संख्या पूर्णपणे मंदावली. सकाळपर्र्यत एकाही नव्या रुग्णांची भर पडली आहे; त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ६३० पर्यंत पोहोचली आहे.
गेल्या महिनाभरात मुंबईसह रेड झोनमधील नागरिक कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने आल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे; पण मंगळवार, बुधवारी ही संख्या मंदावल्याचे चित्र दिसून आले, ही समाधानाची गोष्ट आहे.
सकाळपर्यंत आरोग्य प्रशासनास ७४ चाचणी अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये ७३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. ६३0 पैकी यापूर्वीच्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहहे. आतापर्र्यत ३४२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यात ६३0 पैकी तब्बल २८२ जणांनी कोरोनाशी लढा देत आजारावर मात केल्याने त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले, त्या सर्वांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्याची संख्या २६९ झाली ही दिलासादायक बाब आहे. सद्य:स्थितीत सीपीआरच्या विशेष कोरोना कक्षात ३४२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांपैकी १२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे; तर यापूर्वी सहाजणांचा मृत्यू झाला आहे.
प्रलंबित चाचणी अहवाल संपले
गेल्या १५ दिवसांत क्वारंटाईन केलेल्यांपैकी तपासणीसाठी घेतलेल्या स्रावाचे चाचणी अहवाल प्रलंबित राहण्याची संख्या मोठी होती. त्यामुळे क्वारंटाईन केलेल्या रुग्णाला चाचणी अहवालाची आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत होती; पण शेंडा पार्कमधील प्रयोगशाळेत सिंगापूरहून आलेले नवीन मशीन बसविण्यात आले; त्यामुळे चाचणी अहवाल झपाट्याने निकाली निघाले. त्यामुळे चाचणी अहवालाची प्रतीक्षा संपली आहे. आता रोजचे किमान २०० चाचणी अहवाल दुसऱ्यााच दिवशी निकाली निघण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या
आजरा- ५०, भुदरगड- ६५, चंदगड- ७१, गडहिंग्लज- ६७, गगनबावडा- ६, हातकणंगले- ६, कागल- ५३, करवीर- १२, पन्हाळा- २४, राधानगरी- ६३, शाहूवाडी- १६७, शिरोळ- ७, नगरपालिका (इचलकरंजी ७, जयसिंगपूर ३, कुरुंदवाड १)- ११, कोल्हापूर महानगरपालिका- २१, इतर जिल्हे व राज्य (पुणे १, कर्नाटक २,आंध्र प्रदेश १, सोलापूर १)- ७.
पॉझिटिव्ह चाचणी प्रमाण घटण्याची शक्यता
गेल्या १५ दिवसांत मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केलेले आहेत, त्यांपैकी लक्षणे न दिसणा?्यांना संस्था विलगीकरण अगर गृह विलगीकरणात ठेवलेले आहे. अशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांची स्रावचाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे रोज काही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे; पण त्याचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.