CoronaVirus : शालेय शैक्षणिक वर्षाचे धोरण स्पष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:18 PM2020-05-26T18:18:03+5:302020-05-26T18:27:11+5:30
शालेय नवीन शैक्षणिक वर्षाबाबत विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांच्यामध्येही संभ्रमावस्था आहे. शिक्षण विभागाने तत्काळ याबाबत नियोजन करून ते जाहीर करावे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन सहाय्यक संचालक सुभाष चौगुले यांना देण्यात आले.
कोल्हापूर : शालेय नवीन शैक्षणिक वर्षाबाबत विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांच्यामध्येही संभ्रमावस्था आहे. शिक्षण विभागाने तत्काळ याबाबत नियोजन करून ते जाहीर करावे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन सहाय्यक संचालक सुभाष चौगुले यांना देण्यात आले.
यावेळी कृती समितीचे अशोक पोवार म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गामुळे शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यातील अनेक शैक्षणिक उपक्रम रद्द करावे लागेल आहेत. दरवर्षी जूनमध्ये नवीन वर्ष सुरू होते. मात्र, कोरोनामुळे झालेली परिस्थिती कधी आटोक्यात येईल याची शाश्वती नाही.
त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ शैक्षणिक वर्षाचे नियोजन करून ते जाहीर करून सर्वांच्या मनातील शंका दूर करावी. यावेळी संभाजीराव जगदाळे, रमेश मोरे, पंडितराव सडोलीकर, चंद्रकांत सूर्यवंशी, विनोद डुणुंग, आदी उपस्थित होते.