CoronaVirus :चौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 01:54 PM2020-06-08T13:54:37+5:302020-06-08T13:56:21+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. शनिवारी चौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात झाली. दिवसभरात पाच हजार ३९८ घरांचा सर्वे केला असून, २५ हजार नागरिकांची तपासणी केली.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. शनिवारी चौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात झाली. दिवसभरात पाच हजार ३९८ घरांचा सर्वे केला असून, २५ हजार नागरिकांची तपासणी केली.
शहरामध्ये १८ मार्चपासून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. यामध्ये एक लाख ४४ हजार ३१९ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये सहा लाख २८ हजार ५३२ नागरिकांची तपासणी झाली. याच प्रकारे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्येही मोहीम राबवण्यात आली. आता चौथ्या टप्प्यातील मोहीम सुरू झाली आहे.
शनिवारी रामानंदनगर, जरगनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, राजेंद्रनगर, ताराराणी कॉलनी, एस. एस. सी. बोर्ड, सोमवार पेठ, शनिवार पेठ, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, रुक्मिनी नगर, टाकाळा, महाडीक माळ, पंचगंगा तालीम, दुधाळी, रंकाळा स्टँड, कदमवाडी, ताराबाई पार्क, रंकाळा टॉवर, मरगाई गल्ली, चंद्रेश्वर गल्ली, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, तोरस्कर चौक, निकम पार्क, रायगड कॉलनी, देवकर पाणंद, साने गुरुजी वसाहत, साळोखेनगर, आपटेनगर, नृसिंह कॉलनी, फुलेवाडी, नाना पाटीलनगर, मोतीनगर, सदर बाजार, कावळा नाका, भोसले पार्क, कदमवाडी, विचारे माळ, राजारामपुरी, मातंग वसाहत, यादवनगर, दौलतनगर, शाहूपुरी, रमणमळा, कनाननगर, ताराबाई पार्क, कसबा बावडा, मोरे-मानेनगर या ठिकाणी घरोघरी जाऊन तपासणी केली.