CoronaVirus In Karnataka : कर्नाटकात उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद, दिवसात १२७ पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 04:27 PM2020-05-19T16:27:25+5:302020-05-19T16:28:25+5:30

बेळगाव  :  कर्नाटकात मंगळवारी सकाळच्या बुलेटिनमध्ये उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद कर्नाटकात झाली आहे. मंगळवारी १२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद कर्नाटकात ...

CoronaVirus In Karnataka: High Corona Patient Record in Karnataka | CoronaVirus In Karnataka : कर्नाटकात उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद, दिवसात १२७ पॉझिटिव्ह 

CoronaVirus In Karnataka : कर्नाटकात उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद, दिवसात १२७ पॉझिटिव्ह 

Next
ठळक मुद्देकर्नाटकात उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंददिवसात १२७ पॉझिटिव्ह, वाढत्या संख्येमुळे चिंता

बेळगाव कर्नाटकात मंगळवारी सकाळच्या बुलेटिनमध्ये उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद कर्नाटकात झाली आहे. मंगळवारी १२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद कर्नाटकात झाली आहे. एकाच दिवशी शंभरहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची ही पहिलीच वेळ आहे.

कर्नाटकातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १३७३ झाली आहे. आजपर्यंत ५३०रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे कर्नाटकात आज पर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे

मंगळवारी सगळ्यात अधिक रुग्णांची नोंद मंडया मध्ये झाली आहे. याशिवाय दावणगेरी, कलबुर्गी आणि शिमोगा येथेही मंगळवारी आढळलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह  रुग्ण आढळले आहेत. काल सोमवारी मिळालेल्या ९९ पैकी जवळपास ८० हुन पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न होते तर आज सकाळच्या बुलेटिन मध्ये देखील मिळालेल्या १२७ पैकी ९१ रुग्ण महाराष्ट्र रिटर्न आहेत त्यामुळे महाराष्ट्र रिटर्नचा धोका वाढला आहे.

३१ मे पर्यंत महाराष्ट्रसह चार राज्यातून कर्नाटकात येणाऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी सकाळचे बुलेटिन नंतर आरोग्य खात्याची महाराष्ट्र रिटर्नच्या वाढत्या संख्येमुळे चिंता नक्कीच वाढली आहे

Web Title: CoronaVirus In Karnataka: High Corona Patient Record in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.