CoronaVirus Lockdown : ३५०० कर्मचारी भरउन्हात म्हणून ३९ लाख नागरिक घरी निवांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 02:52 PM2020-04-04T14:52:06+5:302020-04-04T15:21:06+5:30

‘लॉकडाऊन’मुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता ३९ लाख नागरिक घरात बंदिस्त पण निवांत जीवन जगत आहेत, त्याला महावितरणच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सेवा कारणीभूत ठरली आहे. वीजेसारखी अत्यावश्यक सेवा विनाखंड पुरवण्यासाठी उन्हातान्हात हे कर्मचारी फिरत असल्याने आज निवांतपणाचे सुख जनता अनुभवत आहे. या उन्हाच्या तडाख्यात वीजच नसती तर काय झाले असते याची कल्पना सुध्दा करवत नाही, त्यामुळे या राबणाºया हातांना सलाम ठोकावाच लागेल.

CoronaVirus Lockdown: | CoronaVirus Lockdown : ३५०० कर्मचारी भरउन्हात म्हणून ३९ लाख नागरिक घरी निवांत

CoronaVirus Lockdown : ३५०० कर्मचारी भरउन्हात म्हणून ३९ लाख नागरिक घरी निवांत

Next
ठळक मुद्देअखंड विजेसाठी राबताहेत महावितरणचे कर्मचारीजिल्ह्यात ११ लाख २६ हजार वीज ग्राहकांना सेवा

नसिम सनदी

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’मुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता ३९ लाख नागरिक घरात बंदिस्त पण निवांत जीवन जगत आहेत, त्याला महावितरणच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सेवा कारणीभूत ठरली आहे. वीजेसारखी अत्यावश्यक सेवा विनाखंड पुरवण्यासाठी उन्हातान्हात हे कर्मचारी फिरत असल्याने आज निवांतपणाचे सुख जनता अनुभवत आहे. या उन्हाच्या तडाख्यात वीजच नसती तर काय झाले असते याची कल्पना सुध्दा करवत नाही, त्यामुळे या राबणाºया हातांना सलाम ठोकावाच लागेल.

महावितरणकडून जिल्ह्यातील ११ लाख २६ हजार ४१७ ग्राहकांना विजेचा नियमित पुरवठा केला जातो. ‘लॉकडाऊन’मुळे सर्व यंत्रणा ठप्प झाल्या असताना महावितरण मात्र अखंडपणे आपल्या कामात मग्न आहे. ‘कोरोना’पासून बचावासाठी सुरक्षा साधने, परस्परांमध्ये अंतर ठेवणे, कार्यालयात कमी कर्मचारी राहतील, अधिकारी आॅनलाईनच संपर्क साधतील, असे नियोजन करून ग्राहकांना वीज सेवा अखंडपणे सुरू राहील यासाठी दक्षता घेतली.

त्यामुळे आज लॉकडाऊनची घोषणा होऊन ९ दिवस झाले तरी कोठेही महावितरणच्या सेवाबद्दल तक्रार आली नाही. कुठे वीज पुरवठा खंडित झाला असेल तर एका तासाच्या आत ते काम पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.

घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी अशा ग्राहकांना वीज पुरवण्यासाठी वायरमन, आॅपरेटर, इंजिनिअर हे प्रत्यक्ष फील्डवर तर कार्यालयात काम करण्यासाठी रोज तीन ते चार कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास राखीव कर्मचारीही तयार आहेत. या सर्वांना अत्यावश्यक सेवेचे पास दिले आहेत.

मास्क व सॅनिटायझरसाठी एक हजार रुपये

मास्क आणि सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना महावितरणकडून प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले आहेत.

पोलिसांकडून दंडाची पावती

अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही पोलिसांकडून अडवणूक होण्याचे प्रकार घडू लागल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. जयसिंगपूरमध्ये असाच वीज पुरवठा सुरळीत करून परतत असताना पोलिसांनी गाडी रोखून दंडाची पावतीही फाडली आहे.

‘महावितरण’कडून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचीही काळजी घेतली जात आहे. ग्राहकांना अखंड सेवा देतानाच या कर्मचाऱ्यांना मास्कसह अन्य सुरक्षा साधने दिली आहेत. ग्राहकांनी महावितरणच्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची कदर करावी एवढीच अपेक्षा आहे.
सागर म्हारुलकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

 

Web Title: CoronaVirus Lockdown:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.