CoronaVirus Lockdown : जिल्ह्यातील 12 निवारागृहांमध्ये राज्यातील 80 परराज्यातील 273

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:23 PM2020-05-12T17:23:30+5:302020-05-12T17:27:31+5:30

 कोल्हापूर जिल्ह्यातील 12 निवारागृहांमध्ये राज्यातील 80 आणि परराज्यातील 273 अशा एकूण 353 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

CoronaVirus Lockdown: 273 out of 80 out of 80 in 12 shelters in the district | CoronaVirus Lockdown : जिल्ह्यातील 12 निवारागृहांमध्ये राज्यातील 80 परराज्यातील 273

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यातील 12 निवारागृहांमध्ये राज्यातील 80 परराज्यातील 273

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील 12 निवारागृहांमध्ये राज्यातील 80 परराज्यातील 273जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली माहिती

 कोल्हापूर : जिल्ह्यातील 12 निवारागृहांमध्ये राज्यातील 80 आणि परराज्यातील 273 अशा एकूण 353 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

        कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 16 परराज्यातील 3 अशा 19 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 9 परराज्यातील 13 अशा 22 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. मुलींची शाळा क्र. 6 लाईन बाजार येथे राज्यातील 8 परराज्यातील 6 असे एकूण 14 असून याची क्षमता 30 जणांची आहे.

       करवीर - सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी  येथे राज्यातील 1 परराज्यातील 33 एकूण 34 जण असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळाईवाडी - परराज्यातील 57 असे एकूण 57 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे.
कागल - श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 1 परराज्यातील 43 असे एकूण 44 जण असून क्षमता 300 जणांची आहे. नवोदय विद्यालय, कागल - परराज्यातील 21 एकूण 21 जण असून क्षमता 150 आहे.

        हातकणंगले - अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील 2 परराज्यातील 8 असे एकूण 10 जण असून क्षमता 115 जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील 25 परराज्यातील 10 एकूण 35 जण असून क्षमता 55 जणांची आहे. 

शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 12 परराज्यातील 3 असे एकूण 15 क्षमता 50 आहे. उर्दू हायस्कूल जयसिंगपूर येथे राज्यातील 1 परराज्यातील 1 एकूण 2 क्षमता 50 आहे.

 गगनबावडा- समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 5 परराज्यातील 75 असे एकूण 80 असून क्षमता 105 जणांची आहे. यामध्ये कर्नाटकातील 118, तामिळनाडूमधील 58, राजस्थानमधील 25, मध्यप्रदेशमधील 26,  उत्तर प्रदेशमधील 31, केरळमधील 8, आंध्रप्रदेश 2, झारखंड 4, बिहार 1 अशा एकूण 9 राज्यातील 273 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 80 असे मिळून 353 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात 6 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 389 जणांची सोय

जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 6 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 389 जण घेत आहेत.

   करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. हॉटेल आनंद कोझी, लक्ष्मीपुरी. हातकणंगले- अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव. गगनबावडा- समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह. कागल - श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल. नवोदय विद्यालय कागल अशा सहा ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आली आहेत.
 

Web Title: CoronaVirus Lockdown: 273 out of 80 out of 80 in 12 shelters in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.