CoronaVirus Lockdown : मुंबई, पुण्यातून दिवसात ६०० वाहने कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 04:00 PM2020-05-16T16:00:12+5:302020-05-16T16:10:33+5:30
मुंबई, पुणे येथून गुरुवारी (दि. १४) ६०० वाहने कोल्हापुरात दाखल झाली असून, त्यांपैकी ४०० वाहने मुंबईतील आहेत. या दोन्ही शहरांसह रेड झोनमधील प्रवाशांना कोल्हापूरला पाठविण्यात येऊ नये, अशी विनंती पोलीस महासंचालकांना केली असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर : मुंबई, पुणे येथून गुरुवारी (दि. १४) ६०० वाहने कोल्हापुरात दाखल झाली असून, त्यांपैकी ४०० वाहने मुंबईतील आहेत. या दोन्ही शहरांसह रेड झोनमधील प्रवाशांना कोल्हापूरला पाठविण्यात येऊ नये, अशी विनंती पोलीस महासंचालकांना केली असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
मुंबई, पुण्यातून कोल्हापुरात आतापर्यंत ८६ हजार लोक दाखल झाले आहेत. त्यामुळे स्राव तपासणीच्या प्रयोगशाळेवर ताण वाढला आहे. त्यामुळे आधीचे अहवाल येईपर्यंत रेड झोन व मुंबई, पुण्याच्या नागरिकांनी थोडा संयम राखावा. रेड झोनमधून येणाऱ्या अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असून हे चिंताजनक आहे.
मेडिकल इमर्जन्सी असेल, तरच रेड झोन आणि मुंबई, पुण्यातील प्रवाशांना सोडावे. या दोन्ही शहरांमधील नागरिकांनी गरज असेल तरच कोल्हापुरात यावे. त्यांनी थोडा संयम राखावा. मुंबईमध्ये अधिकृतपणे पॉझिटिव्ह असताना दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी मुंबई कोल्हापूर प्रवास केला, हे धक्कादायक असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.