CoronaVirus Lockdown : सुशिक्षित कोल्हापूरकरांचा पुन्हा रस्त्यावर संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 07:03 PM2020-04-03T19:03:58+5:302020-04-03T19:04:49+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात तसेच शहरी भागात ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनास चांगले यश मिळत असल्याचा एकीकडे अनुभव असताना दुसरीकडे मात्र शहरवासीयांकडून अद्यापही सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभर शहरात अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर आले होते. वाहनांची वर्दळसुद्धा होती.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात तसेच शहरी भागात ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनास चांगले यश मिळत असल्याचा एकीकडे अनुभव असताना दुसरीकडे मात्र शहरवासीयांकडून अद्यापही सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभर शहरात अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर आले होते. वाहनांची वर्दळसुद्धा होती.
जीवघेण्या कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद सीईओ अमन मित्तल, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, सीपीआर रुग्णालय प्रशासन यांच्यासह सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका जिवाचे रान करीत आहेत.
गेल्या दहा, बारा दिवसांतील त्यांचे सामूहिक प्रयत्नातून त्याला बऱ्यापैकी यश सुद्धा मिळाले आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांतून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही.|