CoronaVirus Lockdown : गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:56 PM2020-05-07T17:56:49+5:302020-05-07T17:57:57+5:30

लॉकडाऊनमुळे रसवंतीला लागणारा ऊस जिल्ह्यात शिल्लक आहे.या ऊसाच्या गाळपासाठी जिल्ह्यातील भुयेवाडी (ता.करवीर),बाचणी,उत्रे,वंदूर येथील गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू झाली आहेत.

CoronaVirus Lockdown: Cattle chimney resumes | CoronaVirus Lockdown : गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू

भुयेवाडी ( ता.करवीर) येथील सचिन चौगले यांचे सुरु असलेले गुऱ्हाळघर...

googlenewsNext

सतीश पाटील

शिरोली : लॉकडाऊनमुळे रसवंतीला लागणारा ऊस जिल्ह्यात शिल्लक आहे.या ऊसाच्या गाळपासाठी जिल्ह्यातील भुयेवाडी (ता.करवीर),बाचणी, उत्रे, वंदूर येथील गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू झाली आहेत.

कोरोना मुळे संपूर्ण देशभरात गेल्या दिड महिन्या पासुन लॉकडाऊन आहे. सर्व व्यवहार बंद झाले आहेत. ज्या प्रमाणे सर्वच उद्योग आणि व्यवसायांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे तसाच पश्चिम महाराष्ट्रातील रसवंती व्यवसायाला ही बसला आहे.

उन्हाळ्यात कोल्हापूर,सांगली,सातारा येथे मोठ्या प्रमाणात रसवंती व्यवसाय सुरू असतो. यासाठी हे व्यावसायीक शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात उस खरेदी करत असतात. चालू वर्षी ही मोठ्या प्रमाणात रसवंती व्यवसायीकांनी उस खरेदी करुन शेतकऱ्यांना ऍडव्हान्सही काही प्रमाणात दिला होता.

पण ऐन उन्हाळ्यात कोरोनाचा शिरकाव भारतात झाला आणि खबरदारी म्हणून गेली ४५ दिवसापासून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे रसवंतीचा उस शेतातच अडवून पडला. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखरकारखाने बंद झाले होते.गुऱ्हाळघरे ही फेब्रुवारी महिन्यात बंद झाले होते.पण शेतकरीच शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार.

शिल्लक उस गाळपासाठी घेऊन शेतकरी गुऱ्हाळघराच्या मालकांच्याकडे आले पण गुऱ्हाळघरे
पुन्हा सुरू करायची म्हणजे मनुष्यबळ लागत तरी ही कमी मनुष्यबळावर जिल्ह्यातील भुयेवाडी, वंदूर, उत्रे, बाचणी येथील गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत.

सर्वसाधारणपणे गुऱ्हाळघरे सुरू करण्याचा हंगाम आॅक्टोबंर महिन्यात सुरू होतो.हा हंगाम पाच ते सहा महिने चालतो.लॉकडाऊनपुर्वीच भुयेवाडी, निगवे दुमाला परिसरातील गुऱ्हाळघरे बंद झाली आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रसवंतीसाठी ८६०३२ या ऊस लागवड केलेली असते. लॉकडाऊनमुळे गेल्या दिड महिन्यांपासून रसवंती व्यवसाय बंद असल्यामुळे रसवंतीचा ऊस शिल्लक राहिला आहे.

रसवंतीचा धंदा मे महिन्यापुरता राहीला आहे.पण लॉकडाऊन वाढल्याने यंदाचा रसवंतीचा व्यावसाय वाया गेल्याने रसवंतीचा ऊस गाळप करण्याचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे.तसेच आडसाली ऊस व नर्सरीसाठी ऊस रोपांसाठी ऊस डोळा काढून घेऊन शिल्लक राहीलेला ऊस ही गाळपासाठी येत आहे.असा प्रत्येक गुऱ्हाळावर ऊस येतो.

भुये, भुयेवाडी, कासारवाडी,तमदलगे,हातकणंगले येथून ऊस उत्पादक शेतकरी स्वतः तोड करून ऊस पोहोच करत आहेत तर नर्सरीतील ऊसाचे तुकडे पोत्यामध्ये भरून तेही गुऱ्हाळ घरावरती पोच केले जात आहेत. त्यामुळे गुऱ्हाळ घरातील आठ ते दहा मजुरा वरची गुऱ्हाळ घरे सुरू आहेत. सध्या कोल्हापूर बाजार समितीत गुळाला ४००० ते ४२०० रुपये इतका दर मिळत आहे. त्यामुळे गुऱ्हाळघर मालकांनी पुन्हा गुर्हाळ घरे सुरू केली आहेत.

महिना-दिड महिना गुऱ्हाळघर सुरू राहतील

लॉकडाऊन मुळे उस शेतात शिल्लक आहे.पुढील महिना -दिड महिना उस गाळपासाठी येईल, असे गुऱ्हाळ मालकानी सांगितले.

गुळाला चांगला दर...
गुळ हंगाम संपला आहे पण शिल्लक राहिलेला उस पुन्हा गाळपासाठी येत असुन गुळाला ४००० ते ४५०० इतका प्रति क्लिंटल दर मिळत आहे.
 


रसवंती व्यवसाय बंद असल्यामुळे ८६०३२ ऊस शिल्लक राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकरी संकटात आला आहे.त्यामुळे आम्ही पुन्हा गुऱ्हाळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रसवंतीचा ऊस,आडसाली ऊस व नर्सरीतील उसाचे तुकडे हा ऊस गुऱ्हाळ घरावर येत आहे.त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत हा गळीत हंगाम सुरू राहील.
-सचिन चौगले,
गुऱ्हाळघर मालक, भुयेवाडी
 


रसवंतीसाठी ८६०३२ जातीचा आडसाली लागण केलेला आणि १२ महीने पुर्ण झालेला ऊस वापरतो. या ऊसासाठी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना अ‍ॅडव्हान दिलेला असतो.लॉकडाऊनमुळे चालू वर्षी व्यवसाय बंद असल्यामुळे ऊस घेतला नसल्याने अ‍ॅडव्हान बुडाला आहे.तसेच व्यवसाय बंद असल्यामुळे रसवंती गृह चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सागर पाटील,
रसवंती व्यावसायीक

Web Title: CoronaVirus Lockdown: Cattle chimney resumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.