CoronaVirus Lockdown : कोल्हापूरातील महापालिकेकडची विकास कामे थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:31 PM2020-05-08T17:31:26+5:302020-05-08T17:36:11+5:30
कोव्हीड १९ मुळे शासनाने कामांची मर्यादा ठरवून दिलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत वर्कऑर्डर दिलेल्या नाहीत अशी सर्व कामे थांबवावी लागणार आहेत. तसेच महापालिकेकडे निधी कमी असल्याने स्वनिधीतील कामेही काही कालावधीसाठी थांबवावी लागणार आहेत. अशी माहिती महानगरपालिका स्थायी समिती सभेत शुक्रवारी देण्यात आली.
कोल्हापूर : कोव्हीड १९ मुळे शासनाने कामांची मर्यादा ठरवून दिलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत वर्कऑर्डर दिलेल्या नाहीत अशी सर्व कामे थांबवावी लागणार आहेत. तसेच महापालिकेकडे निधी कमी असल्याने स्वनिधीतील कामेही काही कालावधीसाठी थांबवावी लागणार आहेत. अशी माहिती महानगरपालिका स्थायी समिती सभेत शुक्रवारी देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप कवाळे होते. प्रामुख्याने शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानामधील कामे सुरु राहतील, असा खुलासा यावेळी करण्यात आला.
सोशल डिस्टन्सींग ठेवून स्थायी समिती सभा घेण्यात आली, काही सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यामध्ये भाग घेतला.
सभागृहात विजय सुर्यवंशी, सत्यजीत कदम, शारंगधर देशमुख, अजित राऊत, भूपाल शेटे, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, उप आयुक्त निखील मोरे, नगरसचिव सुनील बिद्रे, आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखपाल संजय सरनाईक उपस्थित होते.