CoronaVirus Lockdown : कोल्हापुरात चित्रपटनिर्मितीचे स्वागतच; डिक्क्कीची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:48 PM2020-05-12T12:48:31+5:302020-05-12T12:50:31+5:30
कोल्हापुरात येऊ पाहत असणाऱ्या मालिका, वेबसिरिज, चित्रपटनिर्मितीचे कोल्हापूर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे स्वागत करण्यात आले आहे. त्यासंंबंधीचे निवेदन जिल्हा समन्वयक संजय वाघ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरात येऊ पाहत असणाऱ्या मालिका, वेबसिरिज, चित्रपटनिर्मितीचे कोल्हापूर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे स्वागत करण्यात आले आहे. त्यासंंबंधीचे निवेदन जिल्हा समन्वयक संजय वाघ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
चित्रीकरण सुरू झाल्यामुळे छोट्या-मोठ्या बऱ्याच उद्योगांना बळ मिळणार आहे. बेरोजगार हातांना काम मिळणार आहे. कोरोनाच्या काळापुरतेच नव्हे तर कोल्हापुरात या व्यवसाय कायमस्वरूपी विकसित व्हावा यासाठीच पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हा व्यवसाय चांगला सुरू झाला तर पर्यटनासह हॉटेल, वाहतूक व अन्य अनुषंगिक व्यवसायांनाही त्याचा लाभ होऊ शकेल. त्यामुळे संकुचित विचार करून या प्रक्रियेला विरोध करू नये.