CoronaVirus Lockdown : नियम तोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथके, महापालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:02 PM2020-05-07T17:02:16+5:302020-05-07T17:06:30+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क, हँडग्लोव्हज, सोशल डिस्टंन्स यांसंबंधीचे नियम मोडणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाच पथकांची स्थापना केली आहे.
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क, हँडग्लोव्हज, सोशल डिस्टंन्स यांसंबंधीचे नियम मोडणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाच पथकांची स्थापना केली आहे.
शहरातील फळ व भाजी विक्रेते, व्यावसायिक आस्थापना यांनी मास्क व हँडग्लोव्हजचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर कायम मास्क अथवा रुमाल वापरणे, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, घाण न करणे असे नियमदेखील केले आहेत.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नागरिक, भाजीविक्रेते, दुकानदार, फळविक्रेते यांच्यावर येथून पुढे दंडात्मक कारवाई आणखी तीव्र करण्यात आली असून, येथून पुढे सोशल डिस्टन्स न पाळल्याबद्दल ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा सोशन डिस्टन्स न पाळल्यास दुप्पट दंड अथवा फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
कारवाई तीव्र करण्यासाठी महापालिकेने पाच पथके स्थापन केलेली आहेत. यामध्ये विभागीय कार्यालय क्रमांक १ अंतर्गत पथकप्रमुख म्हणून जयवंत पवार, विभागीय कार्यालय क्रमांक २ अंतर्गत पथकप्रमुख म्हणून राहुल राजगोळकर, विभागीय कार्यालय क्रमांक ३ अंतर्गत पथकप्रमुख म्हणून महानंदा सूर्यवंशी, विभागीय कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत पथकप्रमुख म्हणून सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.