CoronaVirus Lockdown : परराज्यांत  जाणाऱ्या कामगारांचा ओघ कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:23 PM2020-05-25T17:23:22+5:302020-05-25T17:25:55+5:30

लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आल्याने व्यापार आणि उद्योग-धंदे सुरू झाले असून कामगारांना काम मिळू लागल्याने पररराज्यांतील कामगार गावी जाण्याचे टाळत असल्याचे चित्र सोमवारी कोल्हापुरातील रेल्वे स्थानकांवर पाहण्यास मिळाले. उत्तरप्रदेश येथील अलाहाबादकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये ८८० आसनाची क्षमता असून सुद्धा फक्त ३३०च कामगार रवाना झाले.

CoronaVirus Lockdown: The flow of workers to foreign countries is reduced | CoronaVirus Lockdown : परराज्यांत  जाणाऱ्या कामगारांचा ओघ कमी

CoronaVirus Lockdown : परराज्यांत  जाणाऱ्या कामगारांचा ओघ कमी

Next
ठळक मुद्देपरराज्यांत  जाणाऱ्या कामगारांचा ओघ कमीफक्त ३३० कामगार रवाना : जिल्ह्यात उद्योग सुरू झाल्याचा परिणाम

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आल्याने व्यापार आणि उद्योग-धंदे सुरू झाले असून कामगारांना काम मिळू लागल्याने पररराज्यांतील कामगार गावी जाण्याचे टाळत असल्याचे चित्र सोमवारी कोल्हापुरातील रेल्वे स्थानकांवर पाहण्यास मिळाले. उत्तरप्रदेश येथील अलाहाबादकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये ८८० आसनाची क्षमता असून सुद्धा फक्त ३३०च कामगार रवाना झाले.

हाताशी काम नसल्यामुळे परराज्यांतील अनेक कामगार आपापल्या मूळ गावाकडे परतत असल्याने कोल्हापुरातून सुटणारी श्रमिक रेल्वे हाऊसफुल्ल धावत होत्या. सोमवारपर्यंत २३ रेल्वेंमधून ३० हजार ८४९ मजूर कोल्हापुरातून रवाना झाले. यामध्ये जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड व ओडिशाकडे रवाना झाले आहेत.

कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. त्यामुळे सोमवारी उत्तरप्रदेश येथील आलाहाबादकडे जाणाऱ्या रेल्वेची आसन क्षमता ८८० असून सुध्दा फक्त अवघे ३३० प्रवासी गेले. रेल्वेमध्ये काही जागा शिल्लक असल्याने रेल्वे प्रशासनाच्यावतीने पुणे येथून काही कामगारांना या गाडीतून पाठविण्याचे नियोजन केले.

छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे सोमवारी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विजयानंद पोळ, सामाजिक कार्यकर्ते आनंदा करपे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही रेल्वे अलाहाबादकडे रवाना झाली. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव नरके, तानाजी लांडगे, सागर यवलूजे, सागर राणे, बंडोपंत मालप, अविनाश बावडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: CoronaVirus Lockdown: The flow of workers to foreign countries is reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.