CoronaVirus Lockdown : सहा लाख ४३ हजार ९६१ नागरिकांची दुसऱ्यांदा आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 04:20 PM2020-05-16T16:20:43+5:302020-05-16T16:24:21+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख ४५ हजार १०२ घरांचे सर्वेक्षण केले असून, यामध्ये सहा लाख ४३ हजार ९६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख ४५ हजार १०२ घरांचे सर्वेक्षण केले असून, यामध्ये सहा लाख ४३ हजार ९६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्याची सुरुवात १८ मार्चपासून सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये एक लाख ४४ हजार ३१९ घरांचे सर्व्हेक्षण झाले असून यामध्ये सहा लाख २८ हजार ५३२ नागरिकांची तपासणी केली.
महापालिकेच्या ११ नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचारी काम करीत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील गुरुवारी ५ हजार ६६५ घरांचे व २५ हजार ५०० लोकांचे सर्वेक्षण झाले.
यामध्ये कदमवाडी, कावळा नाका, कारंडे मळा, जाधववाडी, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, टाकाळा, रुईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, बाजार गेट, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, तोरस्कर चौक, पंचगंगा तालीम, दुधाळी, रंकाळा स्टँड, राजाराम चौक, मरगाई गल्ली, विजयनगर, संभाजीनगर, सरनाईक कॉलनी, साळोखेनगर, गणेश कॉलनी, बापूरामनगर, देवकर पाणंद, प्रथमेशनगर, आपटेनगर, कनाननगर, शिवाजी पार्क, शनिवार पेठ, शाहूपुरी, जुना बुधवार पेठ, कामगार चाळ, जवाहरनगर, मंगळवार पेठ, प्रतिभानगर, यादवनगर, शाहूनगर, शास्त्रीनगर, शाहू मिल, अंबाई टँक, लक्षतीर्थ वसाहत, नाना पाटीलनगर, फुलेवाडी या ठिकाणी गुरुवारी (दि. १४) सर्वेक्षण केले.