CoronaVirus Lockdown : शिवाजी विद्यापीठ परिसरात आढळला स्थलांतरित पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 04:56 PM2020-05-08T16:56:10+5:302020-05-08T16:59:12+5:30

रूडी शेलडक (टॅडोर्ना फेरुनिया) नावाचा स्थलांतरित पक्षी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांना आढळला. अलीकडच्या काळात प्रथमच हा पक्षी विद्यापीठ परिसरात निदर्शनास आल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे.  शनिवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाच्या पार्श्वभूमीवर प्राणीशास्त्र अधिविभागाकडून ही माहिती देण्यात आली.

CoronaVirus Lockdown: Migratory bird found in Shivaji University premises | CoronaVirus Lockdown : शिवाजी विद्यापीठ परिसरात आढळला स्थलांतरित पक्षी

CoronaVirus Lockdown : शिवाजी विद्यापीठ परिसरात आढळला स्थलांतरित पक्षी

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ परिसरात आढळला स्थलांतरित पक्षीप्राणीशास्त्र विभागातील सुनील गायकवाड यांच्याकडून नोंद 

कोल्हापूर : रूडी शेलडक (टॅडोर्ना फेरुनिया) नावाचा स्थलांतरित पक्षी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांना आढळला. अलीकडच्या काळात प्रथमच हा पक्षी विद्यापीठ परिसरात निदर्शनास आल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे.  शनिवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाच्या पार्श्वभूमीवर प्राणीशास्त्र अधिविभागाकडून ही माहिती देण्यात आली.

प्राणीशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. सुनील एम. गायकवाड विद्यापीठ परिसरातील पृष्ठवंशीय प्राण्यांवर काम करत आहेत. रूडी शेलडक हा स्थलांतरित पक्षी त्यांना सर्वप्रथम ७ मार्चला वि. स. खांडेकर भाषा भवनच्या पिछाडीस असलेल्या तलावामध्ये आढळला.

ह्या पक्षाची नोंद करून त्यांनी त्याची छायाचित्रे घेतली. भारतातील अनेक स्थलांतरित पक्षांपैकी रुडी शेलडक असून त्याला भारतात ब्राह्मणी बदक म्हणूनही ओळखतात. या विशिष्ट पक्षाची लांबी २३ ते २८ इंच इतकी व वजन सव्वा किलो असते. त्याचे डोके फिकट गुलाबी असून पिसे नारंगी-तपकिरी रंगाची तर शेपटीकडील पिसे काळी असतात.

हा प्रवासी पक्षी आहे. तो भारतीय उपखंडांत हिवाळ्यात आगमन करतो आणि एप्रिलमध्ये परत जातो. हा सुमारे २६०० किलोमीटर इतका प्रवास करू शकतो आणि जवळपास ६००० मीटर इतक्या उंचीवर पोहोचू शकतो. जगामध्ये याचा आढळ उत्तर-पश्चिम आफ्रिका, इथिओपिया, दक्षिण-पूर्व युरोप ते मध्य-आशिया ओलांडून दक्षिण-पूर्व चीनपर्यंत व दक्षिण आशियामध्ये आहे.

बौद्ध लोक या पक्षास पवित्र मानतात. त्यामुळे मध्य व पूर्व आशियामध्ये या पक्ष्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळते. जिथे यांची संख्या स्थिर किंवा वाढत असल्याचे मानले जाते. हा बदक मुख्यत: तलाव, जलाशय आणि नद्यांसारख्या पाणथळ जागी राहतो, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.

बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड

दरवर्षी ९ मे हा दिवस जागतिक स्थलांतरित पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या पक्षीदिनाचा विषय बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड असा आहे.
 

Web Title: CoronaVirus Lockdown: Migratory bird found in Shivaji University premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.