CoronaVirus Lockdown : जागतिक वसुंधरा दिवस- राधानगरी जंगलातील पाणवठे पुनर्जीवित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:59 PM2020-04-22T17:59:39+5:302020-04-22T18:02:35+5:30
जागतिक वसुंधरा दिवसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत.
कोल्हापूर : जागतिक वसुंधरा दिवसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत.
कोरोनो विषाणू रोखण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात पर्यटकांऐवजी प्राणी आणि पक्षी मुक्त संचार करत असल्याचे चित्र नित्याचे दिसत आहे. असे असले तरी पाण्याअभावी मात्र त्यांचे हाल होत आहेत. अनेक प्राणी पाण्यासाठी गावाजवळील शेतात आल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
यामुळे बायसन नेचर क्लबच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून हे पाणवठे आज स्वच्छ केले. जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून वेगवेगळे पाणवठे स्वच्छ करण्याचे क्लबचे नियोजन करण्यात आले आहे.या मोहिमेत नेचर क्लबचे अध्यक्ष सम्राट केरकर, रुपेश बोंबाडे, गणेश डब्बे, अक्षय केरकर,सनथ केरकर यांनी भाग घेतला.
जंगल पठारावरील पाणवठे पाण्याने भरणार
वन्यजीव विभागाने परवानगी दिली तर लवकरच टँकरद्वारेही जंगल पठारावरील पाणवठ्यात पाणी सोडण्यात येणार आहे. या मोहिमेत गतवर्षी वेगवेगळ्या दानशूर व्यक्ती,संस्थांच्या मदतीतून ४० टँकर पाणी पाणवठ्यावर टप्या टप्याने सोडण्यात आले होते.
बायसन नेचर क्लबचा उपक्रम
जंगल परिसरातील पाणवठे स्वच्छ करण्याची ही मोहीम व्यापक प्रमाणात नेचर क्लबतर्फे दरवर्षी राबवण्यात येते. याहीवर्षी नेचर क्लबने ही मोहिम सुरु केली आहे.