CoronaVirus Lockdown : हमे गाव जाना है, परमिशन दो, यड्रावमध्ये परप्रांतीय कामगार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 06:41 PM2020-05-12T18:41:22+5:302020-05-12T18:42:55+5:30

यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहत परिसरातील परप्रांतीय कामगार आपआपल्या प्रांतात जाण्यास उतावीळ आहेत . याकरिता शासनाकडून लवकर परवानगी मिळत नसल्याने ते अस्वस्थ व संतप्त झाल्याने यादकामगारांनी इचलकरंजी जयसिंगपूर मार्गावर दहाच्या सुमारास रस्ता रोको केला "हमे गाव जाना है ""परमिशन दो" या घोषणांनी परिसर दुमदुमला सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी कामगारांची समजूत काढल्याने वातावरण शांत झाले .

CoronaVirus Lockdown: We have to go to the village, give permission, foreign workers are aggressive in Yadrav | CoronaVirus Lockdown : हमे गाव जाना है, परमिशन दो, यड्रावमध्ये परप्रांतीय कामगार आक्रमक

CoronaVirus Lockdown : हमे गाव जाना है, परमिशन दो, यड्रावमध्ये परप्रांतीय कामगार आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्देहमे गाव जाना है, परमिशन दो, यड्रावमध्ये परप्रांतीय कामगार आक्रमक कामगार आयुक्तांच्या समजुतीनंतर वातावरण शांत

यड्राव: येथील पार्वती औद्योगिक वसाहत परिसरातील परप्रांतीय कामगार आपआपल्या प्रांतात जाण्यास उतावीळ आहेत . याकरिता शासनाकडून लवकर परवानगी मिळत नसल्याने ते अस्वस्थ व संतप्त झाल्याने यादकामगारांनी इचलकरंजी जयसिंगपूर मार्गावर दहाच्या सुमारास रस्ता रोको केला "हमे गाव जाना है ""परमिशन दो" या घोषणांनी परिसर दुमदुमला सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी कामगारांची समजूत काढल्याने वातावरण शांत झाले .

पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये उत्तर प्रदेश,बिहार, मध्यप्रदेश, झारखंड ,पश्चिम बंगाल ,आंध्र यासह विविध प्रांतातील कामगारांची संख्या जास्त आहे .देशभरात लॉक डाऊनसुरू झाल्याने या ठिकाणी कामगारांना काम नाही तसेच घरच्या लोकांच्या आठवणीने ते व्याकूळ झाले आहेत.

अशा परिस्थितीत काही कामगार आपापल्या जबाबदारीवर चालत तसेच सायकलने सांगली जिल्ह्यात जात असताना त्यांना प्रवेश नाकारला यामुळे त्यांना परत इकडे यावे लागले शासनाकडून ज्या त्या राज्यात कामगारांना पाठवण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होऊन वाहतूक व्यवस्था झाल्याशिवाय कामगारांना पाठविण्याची व्यवस्था होत नाही .

अशी परिस्थिती असताना कामगारांकडे शासन लक्ष देत नसल्याची भावना व घरच्या ओढीची व्याकुळता यामुळे आज सकाळी दहाच्या सुमारास इचलकरंजी जयसिंगपूर रोड वरील गजानन मंदिर या ठिकाणी सर्व कामगार एकत्र आले त्यांनी रस्ता रोको केला.यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

"हमे गाव जाना है ,हमे परमिशन दो"हमारी रेल कब छोडेंगे"अशा घोषणा दिल्या यावेळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश निकम व सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी तुम्हाला तुमच्या गावाकडे जाणे करता व्यवस्था शासन करीत आहे.आपल्या नोंदी प्रमाणे आपल्याला रेल्वे निश्चित झाल्यावर आपणास मोबाईल वर मेसेज येईल त्याप्रमाणे आपण त्या त्या ठिकाणी जायचे आहे.

आपण इतके दिवस संयम राखला आणखी दोन-तीन दिवस संयम राखावा आपली सोय करणे देईल अशी समजूत घातल्यानंतर कामगार शांत झाले.  या ठिकाणी आमदार प्रकाश आवाडे डीवायएसपी गणेश बिरादार, जि प सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, प्रसाद खोबरे,खोतवाडीचे सरपंच संजय चोपडे , गजानन नलगे यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या

Web Title: CoronaVirus Lockdown: We have to go to the village, give permission, foreign workers are aggressive in Yadrav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.