coronavirus: इचलकरंजीत मास्क निर्मितीत तब्बल १६ कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 06:14 AM2020-07-10T06:14:49+5:302020-07-10T06:16:55+5:30
६० ते ७० गारमेंट व्यावसायिक, २०० घरगुती अशा उद्योजकांना त्यामुळे काम मिळाले, तर त्यावर काम करणाऱ्या सुमारे दोन हजार कामगारांना रोजगार मिळाला.
- अतुल आंबी
इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वस्त्रनगरी असलेल्या इचलकरंजीत मास्कनिर्मितीमध्ये लॉकडाऊनच्या काळात सुमारे बारा कोटींची उलाढाल झाली आहे. या कालावधीत अंदाजे दीड ते दोन कोटी मास्कची महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये विक्री केली.
६० ते ७० गारमेंट व्यावसायिक, २०० घरगुती अशा उद्योजकांना त्यामुळे काम मिळाले, तर त्यावर काम करणाऱ्या सुमारे दोन हजार कामगारांना रोजगार मिळाला. तसेच दोन महिन्यांत साधारणत: नऊ लाख पीपीई किटचीही विक्री केली. त्यातूनही चार कोटी रुपयांची उलाढाल झाली. कमी वेळेत जास्त मास्कची मागणी असल्याने अनेकांनी घरगुती स्वरुपात शिवून देणाºया सुमारे २०० महिलांनाही काम दिले. त्यांच्याकडून ६० ते ८० पैसे प्रतिमास्क दराने मजुरीवर शिवून घेतले जात होते.