CoronaVirus News Kolhapur: आंतरराज्य मालवाहतुकीसाठी चालक-वाहकांना सुविधा- सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 05:12 AM2020-05-02T05:12:10+5:302020-05-02T05:12:34+5:30
त्यांनी मालवाहतुकीसंदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत दिली.
कोल्हापूर : आंतरराज्य मालवाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी चालक-वाहकांना सुविधा देण्याचे आश्वासन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी दिले. ही माहिती त्यांनी मालवाहतुकीसंदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत दिली.
परिवहन राज्यमंत्री पाटील म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात विविध प्रकारच्या अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन नियोजनबद्धरीत्या काम करीत आहे. अत्यावश्यक सुविधा सुरळीत राहण्यासाठी शासनाने मागणीनुसार दोन लाख ५८ ८२९ वाहतुकीचे पासेस २७ एप्रिलपर्यंत दिले आहेत. या संकटाच्या काळातही नागरिकांकरिता सेवा देणारे सर्व वाहनमालक, चालक, वाहकांचे सरकारतर्फे मनापासून आभार मानतो. ही आंतरराज्य मालवाहतूक चांगल्या पद्धतीने सुरू राहावी. याकरिता आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टचे अध्यक्ष कुलतनसिंग अटवाल व कोअर कमिटीचे अध्यक्ष व बल मलकित सिंग यांनी मुद्दे उपस्थित केले आहेत. यावर परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या सर्व मागण्यांवर राज्य सरकार ठोस उपाय योजना करील, असे आश्वासन दिले.
>चालक-वाहकांना विमा संरक्षण, राज्यातील टोल माफ करावा. टोल प्लाझा, चेकपोस्ट, पेट्रोलपंप आदी ठिकाणी सॅनिटायझेशनची सुविधा द्यावी. राज्यातील वाहक-चालकांच्या वाहतुकीसाठी पासेस उपलब्ध करावीत. ई-पासची उपलब्धता सहज होण्यासाठी यंत्रणा सक्षम करावी. लॉकडाउनच्या दरम्यान पार्किंग शुल्कात सवलत द्यावी.