CoronaVirus :कॉरन्टाईन मुक्त "पॉझिटिव्ह" आढळून आल्यामुळे मुतगा गावात घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 07:56 PM2020-06-02T19:56:36+5:302020-06-02T19:57:48+5:30
स्वॅब तपासणीचे अहवाल हाती येण्याआधीच इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन रुग्णांना घरी जाण्यास मोकळीक देण्याचा प्रकार उघडकीस आला असून यापैकी कांही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुतगा (ता. बेळगाव) येथे भितीचे वातावरण पसरले आहे.
बेळगांव : स्वॅब तपासणीचे अहवाल हाती येण्याआधीच इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन रुग्णांना घरी जाण्यास मोकळीक देण्याचा प्रकार उघडकीस आला असून यापैकी कांही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुतगा (ता. बेळगाव) येथे भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेली अशी की, पुणे, अहमदाबाद, बेंगलोर व हिरेबागेवाडी येथे जाऊन आलेल्या मुतगा येथील दोन पुरुष व दोन युवती अशा एकूण ४ जणांचे इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन करण्यात आले होते.
गावातील प्राथमिक शाळेमध्ये कॉरन्टाईन करण्यात आलेल्या या चौघा जणांचे १४ दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन पूर्ण होण्याआधी स्वॅबचे नमुने घेण्याऐवजी १५ व्या दिवशी ते नमुने घेण्यात आले. त्यानंतर आणखी तीन दिवस त्यांना कॉरन्टाईन केंद्र ठेवून घेतल्यानंतर स्वॅब नमुन्यांचा अहवाल हाती येण्यापूर्वीच घरी जाऊ देण्यात आले.