Coronavirus : कोल्हापूरचा संशोधक शोधतोय कोरोनावर लस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 06:52 AM2020-03-20T06:52:38+5:302020-03-20T06:53:03+5:30

जय शेंडुरे यांनी बाळाच्या जन्मापूर्वीच त्याला असणाऱ्या संभाव्य आजाराची माहिती शोधण्याचे संशोधन केले होते. गर्भाची डीएनए ब्ल्यू प्रिंट म्हणून २0१२ मध्ये ती विकसित करण्यात आली होती.

Coronavirus: Researchers from Kolhapur looking for vaccine on Corona | Coronavirus : कोल्हापूरचा संशोधक शोधतोय कोरोनावर लस

Coronavirus : कोल्हापूरचा संशोधक शोधतोय कोरोनावर लस

Next

कोल्हापूर : संपूर्ण जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे; त्यामुळे अमेरिका, चीनकडून कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेच्या सीएटल फ्लू स्टडी सेंटरमध्ये संशोधकांचं एक पथक दिवसरात्र कोरोनावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्याचे नेतृत्व एका मराठी माणसाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जय शेंडुरे या युवकाकडे आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध देश प्रयत्न करत आहेत. जय शेंडुरे यांनी बाळाच्या जन्मापूर्वीच त्याला असणाऱ्या संभाव्य आजाराची माहिती शोधण्याचे संशोधन केले होते. गर्भाची डीएनए ब्ल्यू प्रिंट म्हणून २0१२ मध्ये ती विकसित करण्यात आली होती.

जगभरात कोरोनाचा फैलाव झाला आहे. नऊ हजारांपेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे. लोकांचा जीव वाचविण्यासाठी वेगवान हालचाली करण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी लवकरात लवकर यश मिळेल.
- जय शेंडुरे, संशोधक, सीएटल फ्लू स्टडी सेंटर, अमेरिका.

Web Title: Coronavirus: Researchers from Kolhapur looking for vaccine on Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.