CoronaVirus : जिल्ह्यात एकूण ७१० पॉझीटिव्ह, ६११ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:12 PM2020-06-13T12:12:13+5:302020-06-13T12:13:37+5:30

जिल्ह्यात आजअखेर ७१० रूग्णांपैकी ६११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत ९३ प्राप्त अवालापैकी ९१ अहवाल निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण ९१ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

CoronaVirus: A total of 710 positive, 611 people discharged in the district | CoronaVirus : जिल्ह्यात एकूण ७१० पॉझीटिव्ह, ६११ जणांना डिस्चार्ज

CoronaVirus : जिल्ह्यात एकूण ७१० पॉझीटिव्ह, ६११ जणांना डिस्चार्ज

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण ७१० पॉझीटिव्ह, ६११ जणांना डिस्चार्ज२ पॉझीटिव्हमध्ये भुदरगड व चंदगड तालुक्यातील

कोल्हापूर : जिल्ह्यात आजअखेर ७१० रूग्णांपैकी ६११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत ९३ प्राप्त अवालापैकी ९१ अहवाल निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण ९१ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज सकाळी १० वाजेपर्यत प्राप्त २ पॉझीटिव्ह अहवालामध्ये भुदरगड तालुक्यातील-१ व चंदगड तालुक्यातील-१ असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे

आजरा- ७४, भुदरगड- ७१, चंदगड- ७५, गडहिंग्लज- ८१, गगनबावडा- ६, हातकणंगले- ९, कागल- ५७, करवीर- १९, पन्हाळा- २७, राधानगरी- ६४, शाहुवाडी- १७६, शिरोळ- ७, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२५ असे एकूण ७०२ आणि पुणे -१, सोलापूर-३, मुंबई-१, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ असे इतर जिल्हा व राज्यातील ८ असे मिळून एकूण ७१० रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण ७१० रूग्णांपैकी ६११ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ८ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ९१ इतकी आहे.

 

Web Title: CoronaVirus: A total of 710 positive, 611 people discharged in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.