Coronavirus Unlock : जिल्ह्यातील संख्या वाढतीच, गडहिंग्लजची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 11:43 AM2020-07-03T11:43:13+5:302020-07-03T11:47:08+5:30
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून गडहिंग्लज येथील रूग्णालयातील आणखी कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूवारी दिवसभरामध्ये १२ नवे रूग्ण नोंद झाले असून या व्यतिरिक्त मिरज प्रयोगशाळेतून जयसिंगपूर आणि नांदणी येथील प्रत्येकी एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याचे स्ष्पट झाले आहे.
कोल्हापूर- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून गडहिंग्लज येथील रूग्णालयातील आणखी कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूवारी दिवसभरामध्ये १२ नवे रूग्ण नोंद झाले असून या व्यतिरिक्त मिरज प्रयोगशाळेतून जयसिंगपूर आणि नांदणी येथील प्रत्येकी एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याचे स्ष्पट झाले आहे.
दिवसभरामध्ये जे १२ पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील ३ व शहरातील २, हातकणंगले १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजी २, कुरूंदवाड १, सातारा जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मरळी येथील पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती ही शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आली होती.
गुरूवारी रात्री ८ वाजेपर्यंत १२६ प्राप्त अहवालापैकी १०२ निगेटिव्ह तर १२ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. तर १२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ८८० पॉझीटिव्हपैकी ७२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजअखेर जिल्ह्यात एकूण १४२ पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. जयसिंगपूर येथील ७३ तर नांदणी येथील ७० वर्षांचे दोन वृध्द मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल असून या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र हा आकडा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नोदं करण्यात आलेला नाही.
मणेर मळ्यातही शोधमोहिम
इचलकरंजी येथे पॉझिटिव्ह आलेला युवक आपल्या उचगावजवळील मणेरमळ्यात आपल्या मुळ घरी येवून गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गुरूवारी रात्री या ठिकाणी असलेल्या यामुलाच्या घरातील सदस्यांनाही तपासण्यासाठी नेण्यात आले.
तक्ता
तालुका आजचे रूग्ण एकूण रूग्ण
- आजरा ०० ८१
- भुदरगड ०० ७६
- चंदगड ०० ९४
- गडहिंग्लज ०३ १०५
- गगनबावडा ०० ०७
- हातकणंगले ०१ १६
- कागल ०० ५७
- करवीर ०० २६
- पन्हाळा ०० २९
- राधानगरी ०० ६९
- शाहूवाडी ०० १८६
- शिरोळ- ०१ १०
- नगरपरिषद क्षेत्र ०६ ५९
- कोल्हापूर महापालिका ०० ४७
- इतर जिल्हे ०१ १८
- एकूण १२ ८८०