CoronaVirus : थुंकणाऱ्या तरुणास आयुक्तांनी केला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 03:31 PM2020-06-05T15:31:00+5:302020-06-05T20:36:22+5:30

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या नागरी सुविधा केंद्राबाहेर थुंकणाऱ्या एका तरुणास आयुक्त डॉ. मल्लिना‌थ कलशेट्टी यांनी गुरुवारी थुंकल्याबद्दल शिक्षा म्हणून १५० रुपयांचा दंड केला. एवढेच नाही तर त्याच्याकडून तो परिसरही पाण्याने स्वच्छ करवून घेतला.

CoronaVirus: Young man fined by spitting youth | CoronaVirus : थुंकणाऱ्या तरुणास आयुक्तांनी केला दंड

CoronaVirus : थुंकणाऱ्या तरुणास आयुक्तांनी केला दंड

Next
ठळक मुद्देथुंकणाऱ्या तरुणास आयुक्तांनी केला दंड पाणी मारून थुंकलेल्या ठिकाणी केली स्वच्छता

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या नागरी सुविधा केंद्राबाहेर थुंकणाऱ्या एका तरुणास आयुक्त डॉ. मल्लिना‌थ कलशेट्टी यांनी गुरुवारी थुंकल्याबद्दल शिक्षा म्हणून १५० रुपयांचा दंड केला. एवढेच नाही तर त्याच्याकडून तो परिसरही पाण्याने स्वच्छ करवून घेतला.

घरफाळा व इतर देयके भरण्यास नागरी सुविधा केंद्रामध्ये गर्दी वाढत आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रामध्ये गुरुवारी सकाळी आयुक्त कलशेट्टी यांनी पाहणी केली. या पाहणीवेळी नागरी सुविधा केंद्रात पैसे भरण्यासाठी ऋतुराज चव्हाण नावाचा एक तरुण तेथे आला होता. तो त्याच ठिकाणी थुंकत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले.

यावेळी आयुक्तांनी सदरच्या तरुणास थुंकलेल्या ठिकाणी पाणी मारून ते ठिकाण स्वच्छ करण्यास सांगितले. नंतर विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांना  त्यांनी १५० रुपये दंड करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार चव्हाण यास सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल १५० रुपयांची दंडाची पावती केली.

आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांच्या सहभागाची आवश्यकता असून, सर्वांनी मिळून शहर स्वच्छ व सुंदर करावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करू नये, असे आवाहन आयुक्त कलशेट्टी यांनी केले.

Web Title: CoronaVirus: Young man fined by spitting youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.